सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदी महान वैज्ञानिक, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा, गॅस टंचाई दूर होईल: संजय राऊत
 शहर

बाबुरावजी घोलप महाविद्यालयात प्रबोधन कट्ट्याचे उद्घाटन

डिजिटल पुणे    11-03-2026 18:06:34

पुणे : नवी सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने महत्वपूर्ण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नाविन्यपूर्ण अशा प्रबोधन कट्ट्याची स्थापना करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.सदर प्रबोधन कट्ट्याचा उद्देश स्पष्ट करताना भूगोल विभाग प्रमुख डॉ. रमाकांत कसपटे यांनी सोमवार ते शनिवार वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या भूगोल विभागासमोरील नोटीस बोर्डवर लावल्या जाणार असून शनिवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत सदर मुद्द्यावर भूगोल विभागासमोरील प्रबोधन कट्ट्यावर खुली चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले. आपल्या मनोगतात प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी या उपक्रमाबद्दल भूगोल विभागाचे कौतुक करत या माध्यमातून विद्यार्थ्यांचा वाचनाकडे कल वाढून त्यांच्यामध्ये विजिगीषू वृत्ती निर्माण होण्याची आशा व्यक्त केली.
या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वंदना पिंपळे, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. सुभाष वावळ, डॉ. वैशाली बनसोड, डॉ. नागेश भंडारी, डॉ. विशाल पावसे, डॉ. राजेंद्र सरोदे, डॉ. जितेंद्र वडशिंगकर, प्रा. विक्रमादित्य मालतुमकर, डॉ. अमृता इनामदार यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती