सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
  • : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
  • पंतप्रधान बारकाईने लक्ष ठेऊन, कुणीही अफवा पसरवू नका; गॅस पुरवठ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण
  • पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग, अग्निशमन दलाची धाव; जाळ अन् धुराचे लोट
  • : लायबेरियाचे झेंडे लावले, सिग्नल सिस्टीम बंद केली...; युद्धाच्या वणव्यातही सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचे जहाज मुंबईत दाखल
 जिल्हा

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली कार्यान्वित; २४ तासांत डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र

डिजिटल पुणे    12-03-2026 16:28:00

मुंबई  : गुणवंत खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली सुरू केली असल्याची माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.सदर प्रणालीद्वारे खेळाडूंना डिजिटल पडताळणीसह प्रमाणपत्र मिळणार आहे. यावर असलेल्या QR कोडमुळे प्रमाणपत्राची सत्यता संबंधित नियुक्ती प्राधिकरण त्वरित तपासू शकतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंनी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.

खेळाडूंनी https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ प्राप्त करुन घ्यावे, त्याचप्रमाणे जर एखाद्या खेळाडूची माहिती प्रणालीवर उपलब्ध नसल्यास [email protected] या ई-मेलवर स्पर्धेचे नाव, वर्ष आणि प्रमाणपत्राची स्कॅन प्रत पाठवून तक्रार नोंदवता येईल. त्यानंतर विभागस्तरावर पडताळणी करून अभिलेख पोर्टलवर अद्ययावत करण्यात येतील.

सद्यस्थितीत कबड्डी, फेन्सिंग, ट्रायथलॉन (२०२५), ज्युडो (२०२४) आणि कुराश (२०२४-२५ व २०१७-१८) या स्पर्धांचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध असून संबंधित खेळाडूंनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. इतर खेळांचे अभिलेखही टप्प्याटप्प्याने अपलोड करण्याचे काम सुरू आहे.यापूर्वी विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रमाणपत्रांची पडताळणी केलेल्या खेळाडूंनी देखील पुढील भरती प्रक्रियेसाठी या प्रणालीद्वारे डिजिटल प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक असल्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती