सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • घरगुती गॅस उपलब्ध, व्यावसायिक गॅसवर बंदी, रांगा लावू नका; पुण्यातील गॅस तुटवड्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सगळंच सांगितलं
  • : अजित पवारांच्या पावलावर पाऊल; सुनेत्रा पवारांचा बारामतीत 'जनता दरबार'; लाडक्या बहिणींसह, वकिल, नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण, नागरिकांची गर्दी
  • सिलिंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, कंट्रोल रुम बनवा...; राज्य सरकारच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
 शहर

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन संपन्न :

डिजिटल पुणे    13-03-2026 18:02:40

पुणे :पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड रोड, पुणे येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात दिनांक १३  मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन संपन्न झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मामासाहेब मोहोळ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या  चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.," उच्च शिक्षण व शाश्वत विकास" हा या  चर्चासत्राचा विषय आहे.

 १३ तारखेला सकाळी १०.३० वाजता  चर्चासत्राचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. बसवराज कुडचिमठ, विश्वेश्वरया विद्यापीठ, बेळगाव , प्रमुख वक्ते डॉ.कैलास बवले , गोखले इन्स्टिट्यूट, पुणे तसेच बीजभाषक प्राचार्य डॉ. प्रसन्न देशमुख, राजगड ज्ञानपीठ , भोर, प्राचार्य डॉ. प्रतिभा गायकवाड, यशवंतराव मोहिते कॉलेज, प्राचार्य डॉ.वृषाली रणधीर, वाडिया महाविद्यालय व उद्घाटन सत्राचे अध्यक्ष ॲड. मोहनराव देशमुख, खजिनदार,पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाले .

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी यांनी प्रास्ताविकातून भूमिका स्पष्ट करताना सांगितले की," वर्तमानकाळात शाश्वत विकास हा महत्वाचा विषय असून विद्यार्थी, अभ्यासक आणि विषय तज्ञ यांच्या एकत्रित मांडणीतून सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी महत्वाची दिशा मिळणे हे या चर्चासत्राचे फलित असेल." या उद्घाटन सत्रासाठी बीजभाषक म्हणून  लाभलेल्या डॉ. प्रसन्न देशमुख यांनी आपल्या भाषणातून सांगितले की,"  शिक्षकांकडे  शिकविण्याबरोबरच सामाजिक भान असले पाहिजे. शाश्वत विकासाची मानसिकता शिक्षक निर्माण करू शकतो.नैसर्गिक स्रोतांचा विचारपूर्वक वापर करायला शिकविले पाहिजे.डॉ. कैलास बवले यांनी नॉलेज , कॉलेज आणि व्हिलेज या संकल्पनेची मांडणी करत उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास या विषयाबद्दल अभ्यासपूर्ण मते व्यक्त केली.प्राचार्य प्रतिभा गायकवाड व प्राचार्य वृषाली रणधीर यांनीही या प्रसंगी मार्गदर्शन केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख यांनी या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष पद भूषविले. सत्राच्या अखेरीस आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की," शाश्वत विकास निश्चितच गाठता येईल. चर्चासत्रात व्यक्त होणारे विचार, मांडलेली मते या विषयाला अधिक स्पष्ट रूप देतील."

या चर्चासत्रासाठी वेगवेगळ्या विद्यापीठांमधील आणि विविध राज्यातील व  महाविद्यालयातील अनेक अभ्यासक आणि विषयतज्ञ उपस्थित राहिले. उद्घाटन सत्रातच Phoenix International Multidisciplinary ResearchJjournal : ISSN : 2583-6897 या संशोधन पत्रिकेत या चर्चासत्रासाठी लिहिलेल्या ६३ शोधनिबंधांचे प्रकाशन  मा. मोहनराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.दुसऱ्या सत्रात डॉ. बसवराज कुडचिमठ व डॉ. विजय नारखेडे , डॉ . विजय कुमार ववले यांनी चर्चासत्रात मार्गदर्शन केले. 

चर्चासत्राला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थी व अभ्यासकांनी उद्या  दि.१४ मार्च रोजी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या चर्चासत्रात सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी यांनी केले आहे. या चर्चासत्रासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पदाधिकारी मा.मानद सचिव ॲड.संदीप कदम, उपाध्यक्ष मा. राजेंद्र घाडगे, खजिनदार  मोहनराव देशमुख, उप सचिव मा.एल . एम.पवार,  सहसचिव मा.ए.एम.जाधव यांचे मार्गदर्शन लाभले . या चर्चासत्रासाठी डॉ. सपना राणे , डॉ प्रकाश हुंबाड,डॉ .रूपाली शेंडकर, डॉ . श्रीनिवास इपलपल्ली,डॉ. संतोष मोरे, डॉ . आदिनाथ पाठक, डॉ.योगेश पवार,डॉ. एन. डी. पवार, श्री . आशिष परमार इ. नी परिश्रम घेतले.


 Give Feedback



 जाहिराती