सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • घरगुती गॅस उपलब्ध, व्यावसायिक गॅसवर बंदी, रांगा लावू नका; पुण्यातील गॅस तुटवड्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सगळंच सांगितलं
  • : अजित पवारांच्या पावलावर पाऊल; सुनेत्रा पवारांचा बारामतीत 'जनता दरबार'; लाडक्या बहिणींसह, वकिल, नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण, नागरिकांची गर्दी
  • सिलिंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, कंट्रोल रुम बनवा...; राज्य सरकारच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
 विश्लेषण

होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला; अमेरिकेचे 2200 मरीन सैनिक, युद्धनौका आणि फायटर जेट मध्यपूर्वेकडे रवाना

डिजिटल पुणे    14-03-2026 11:29:34

अमेरिका : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक राजकारण आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. होमुर्झ सामुद्रधुनी या महत्त्वाच्या समुद्री मार्गाभोवती तणाव वाढत असताना अमेरिकेने मोठे पाऊल उचलले आहे. सुमारे 2200 मरीन सैनिक, तीन युद्धनौका आणि अत्याधुनिक फायटर जेट्स मध्यपूर्वेकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

माहितीनुसार, अमेरिकेची 31st Marine Expeditionary Unit ही तुकडी या मोहिमेत सहभागी असून तिच्यासोबत F-35 Lightning II फायटर जेट्स आणि Bell Boeing V-22 Osprey विमाने तैनात केली जात आहेत. ही तुकडी सामान्यतः जपान येथे इंडो-पॅसिफिक भागात तैनात असते, मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे तिला मध्यपूर्वेकडे वळवण्यात आले आहे.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने स्पष्ट केले की ही तैनाती थेट जमिनीवरील युद्धासाठी नसून आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देणे, समुद्री सुरक्षा राखणे आणि हवाई मदत उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. या निर्णयाला अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी मंजुरी दिली असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, मिडल ईस्ट परिसरात तणाव वाढल्यामुळे जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनी मार्गावर विशेष लक्ष ठेवले जात आहे. या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू वाहून नेला जातो. त्यामुळे येथे कोणतीही लष्करी चकमक किंवा जहाजांवरील हल्ले झाले तर त्याचा थेट परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर होऊ शकतो.

अमेरिकेने पाठवलेल्या नौदल गटात ‘अॅम्फिबियस रेडी ग्रुप’चा समावेश आहे. या समूहात साधारणपणे एक आक्रमक जहाज, दोन ट्रान्सपोर्ट डॉक जहाजे आणि मरीन सैनिक व लष्करी उपकरणे वाहून नेणारे सहाय्यक जहाज असते. परिस्थिती बिघडल्यास अमेरिकन कमांडर्सना अतिरिक्त लष्करी बळ उपलब्ध व्हावे, हा या तैनातीमागील उद्देश असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

तज्ज्ञांच्या मते, होर्मुझ मार्गावर तणाव वाढल्यास जागतिक तेल पुरवठा आणि इंधनाच्या किमतींवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातील घडामोडींवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती