नवी दिल्ली : शौर्य पुरस्कारप्राप्त माजी सैनिकांच्या मासिक मानधनात वाढ करावी, पुणे कॅंटोन्मेंटमधील संरक्षण खात्याच्या जमिनींचे रक्षण व्हावे, त्याठिकाणी अनधिकृत बांधकाम होऊ नये, मोडकळीस आलेल्या मालमत्तांची दुरुस्ती करावी, अशा विविध मागण्यांसाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली. यासंदर्भात राजनाथ सिंह यांना निवेदन देत त्यांनी सविस्तर चर्चा केली.निवृत्त मेजर व वीरचक्र पुरस्कार विजेते उदय साठे यांच्याद्वारे प्राप्त झालेल्या निवेदनाच्या आधारे शौर्य पुरस्कारार्थींसाठी देण्यात येणाऱ्या मानधनाचा पुनर्विचार करण्याची गरज भारतीय राजपत्रानुसार परमवीरचक्र, महावीरचक्र आणि वीरचक्र प्राप्त सैनिकांसाठी ‘विशेष पेन्शन’ची तरतूद असली, तरी ती पूर्णपणे अंमलात आलेली नाही.
यासह पुणे कॅंटोन्मेंटमधील विविध जागांच्या संदर्भात लक्ष घालून नियमितता आणावी यासाठीही पदाधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेण्याची विनंती केली. माननीय मंत्री महोदय यांनी याबाबत सकारात्मकता व्यक्त केली त्याबद्दल त्यांचे आभार.