सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा इशारा; गुढीपाडव्याच्या सुमारास पावसाची शक्यता, विदर्भात गारपिटीचा धोका
  • दहशतवादी स्थळ सांगून पाकिस्तानकडून रुग्णालयावर एअरस्ट्राईक; 400 जणांनी गमावला जीव, अफगाणिस्तान हादरलं
 शहर

धक्कादायक घटना: दापोडीत मुळा नदीपात्रात महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात मोठी खळबळ

डिजिटल पुणे    17-03-2026 16:44:43

पुणे: दापोडी परिसरात आज दुपारी मुळा नदीत एका अज्ञात महिलाचा मृतदेह आढळून आला. ही घटना सुमारे दुपारी १२:३० वाजता समोर आली, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.घटनास्थळी पोहोचलेली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने विशेष ‘जलपरी’ रेस्क्यू वाहनाच्या साहाय्याने मृतदेह नदीबाहेर काढला. अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. महिला स्वेच्छेने आत्महत्या केली की ही घटना इतर कारणामुळे घडली, याची तपासणी सुरू आहे.

दापोडी पोलीस अद्याप महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत असून, परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी केली जात आहे. मृतदेहाची अधिक तपासणी करून पुढील तपास दापोडी पोलीस करत आहेत. महिलेची ओळख समजल्यावर या रहस्यमय प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती