सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : शुद्धलेखनाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे उतारेच बदलले, महसूल विभागात इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा, दीड लाख शेतकऱ्यांना फटका
  • मोठी बातमी : राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेस उमेदवार देईल, वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य!
  • राज्यात अवकाळीचा इशारा; पुढील दोन दिवस वादळी पावसासह गारपीट, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
  • इस्रायली हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानींचा मुलासह मृत्यू; अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर देशानं युद्धाच्या 18व्या दिवशी सर्वाधिक शक्तिशाली नेता गमावला
 DIGITAL PUNE NEWS

राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

डिजिटल पुणे    18-03-2026 14:57:55

मुंबई  :  राज्यातील शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या हिरवा वाटाणा ऐवजी पांढरा वाटाणा पुरवला जात असल्याची चौकशी सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांकडून करणार आहोत. चौकशीचा अहवाल प्राप्त होताच दोषींवर नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे विधानसभेत स्पष्ट केले.आमदार  कैलास घाडगे पाटील यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरवल्या जाणारा आहार हा विद्यार्थ्यांना सकस मिळावा यासाठी शासनाकडून दर  निश्चित करण्यात आलेले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या आणि बाजार समितीमधील धान्याचे चालू दर विचारात घेऊनच निविदा काढली जाते, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “निविदा निश्चित करण्यापूर्वी अन्नाचे नमुने  घेतले जातात आणि त्यांची प्रमाणित लॅबमध्ये तपासणी केली जाते. हा माल दर दोन महिन्यांनी शाळांना पुरवला जातो.”या प्रश्नाच्या चर्चेत आमदार रमेश बोरनारे, डॉ. नितीन राऊत यांनी सहभाग घेतला.

 


 Give Feedback



 संबंधित बातम्या
 जाहिराती
 जाहिराती