राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय साहसी क्रीडा शिबिरात शिक्षिका कु . अर्चना श्रीचिप्पा यांना ‘उत्कृष्ट संघव्यवस्थापक' पुरस्कार
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित राज्यस्तरीय साहसी क्रीडा शिबिर दि. 7 ते 11 मार्च 2026 दरम्यान चिखलदरा वन प्रशिक्षण संस्था येथे उत्साहात पार पडले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी विविध विद्यापीठांमधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यक्रम अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.या वेळी संघ व्यवस्थापक अर्चना विठ्ठल श्रीचिप्पा, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न यांना “उत्कृष्ट संघव्यवस्थापक” हा राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पाच दिवस चाललेल्या या साहसी क्रीडा शिबिरामध्ये ॲडव्हेंचर, प्रात्यक्षिके, सांस्कृतिक, शिस्त व वागणूक व लेखी परीक्षा अशा विविध ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग घेतला.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा, नेतृत्वगुण,साहसीपणा व राष्ट्रीय भावना विकसित करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या राज्यस्तरीय साहसी क्रीडा शिबिरामध्ये राज्यातील विविध 19 विद्यापीठांमधील 98 स्वयंसेवक आणि 15 संघ व्यवस्थापक , विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे राज्यपाल नामीत व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेंद्र कडू ,अध्यक्षस्थानी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.निलेश कडू, विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. जयंत वडदकर, चिखलदरा महाविद्यालय प्राचार्य डॉ. राजेश जयपुरकर, आर्किटेक्ट उमेश पाटणकर, वनप्रशिक्षण संस्थेचे वन परीक्षक अधिकारी राघवेंद्र मून, वंदना मून व तसेच पाचही जिल्ह्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक आदी मान्यवर उपस्थित होते.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ.प्रशांत मुळे, उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सविता कुलकर्णी तसेच महाविद्यालयातील इतर सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.