सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अवकाळी पावसाचा राज्यभर तडाखा; गारपीट-विजांच्या कडकडाटाने पिकांचे मोठे नुकसान
  • थेट अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानावर संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या! सुरक्षेसाठी तातडीची बैठक बोलावली; दोन्ही नेत्यांच्या शिफ्टिंगचा विचार
 विश्लेषण

कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव

डिजिटल पुणे    20-03-2026 11:14:45

मुंबई : नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर पार पडलेल्या भव्य संचलनात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचे गिरगाव, मुंबई येथे नागरिकांसाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन सर्वसामान्यांना घडत असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.महाराष्ट्राच्या लोकसंस्कृती, संत परंपरा, कला आणि परंपरागत वैभवाचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या या चित्ररथाने राष्ट्रीय पातळीवर विशेष छाप पाडत देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली होती. विविध सांस्कृतिक घटकांचे सजीव आणि आकर्षक सादरीकरण या चित्ररथातून करण्यात आले असून, राज्याच्या वैभवशाली वारशाचे दर्शन घडविणारा हा उपक्रम ठरला आहे.

या चित्ररथाच्या साकार प्रक्रियेत विविध कलाकार, तंत्रज्ञ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकारांनी योगदान दिले असून त्यांच्या सर्जनशीलतेचा उत्कृष्ट आविष्कार या माध्यमातून पाहायला मिळतो. प्रजासत्ताक दिन संचलनात मिळालेल्या यशामुळे राज्याच्या सांस्कृतिक ओळखीला राष्ट्रीय स्तरावर नवे महत्त्व प्राप्त झाले आहे.सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.गिरगाव परिसरातील या प्रदर्शनाला नागरिक, विद्यार्थी, सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन, सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती