सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिका आता इराणमध्ये सैन्य पाठवणार? डोनाल्ड ट्रम्प स्पष्टच बोलले, युरोपीय देशांवर संताप व्यक्त
  • अवकाळी पावसाचा राज्यभर तडाखा; गारपीट-विजांच्या कडकडाटाने पिकांचे मोठे नुकसान
  • थेट अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानावर संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या! सुरक्षेसाठी तातडीची बैठक बोलावली; दोन्ही नेत्यांच्या शिफ्टिंगचा विचार
 शहर

‘चिमणी वाचवा, पर्यावरण जपा’ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी निसर्गाशी जुळवले आपुलकीचे नाते.

डिजिटल पुणे    20-03-2026 17:22:44

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून  प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी  पक्षी संवर्धनासाठी टाकाऊ वस्तू वापरून उन्हाळ्यात पाणी व चाऱ्याच्या सोयीसाठी  ३०० साधने तयार करण्यात आली. ही केवळ निर्मिती नव्हे, तर निसर्गाशी नाते जपण्याची एक जाणीवपूर्वक कृती ठरली. वाढत्या तापमानामुळे आणि झपाट्याने कमी होत चाललेल्या चिमण्यांच्या संख्येमुळे निर्माण झालेल्या चिंतेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमानिमित्त आयोजित कार्यशाळेत सुमारे ७४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे म्हणाले, “उन्हाची तीव्रता वाढत असताना आणि शहरांमधून चिमण्या हळूहळू गायब होत असताना, अशा उपक्रमांची गरज ही केवळ पर्यावरणासाठी नव्हे, तर आपल्या अस्तित्वासाठीही महत्त्वाची आहे.” डॉ. शरद गिरमकर यांनी प्लॅस्टिक बाटल्या, मग, सुतळी यांसारख्या टाकाऊ वस्तू वापरून पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची उपकरणे बनवण्याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. महेश जोशी, डॉ. सुनिता खेडेकर, प्रा. रेखा शिंदे आणि श्री. नारायण खोमणे यांनी उपक्रमाचे आयोजन करून यशस्वी केला.  तसेच विद्यार्थांनी बनवलेले अन्न-पाण्याची साधने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी  आणि डॉ. प्रशांत मुळे यांच्या हस्ते महाविद्यालयीन परिसरात बसवण्यात आली असून, उन्हाळा संपेपर्यंत विद्यार्थ्यांकडून त्यांची काळजी घेतली जाणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती