पुणे : आज पुणे मनपा प्रशासनाने धडक कारवाई करत प्रभाग 29 डेक्कन जिमखाना हैप्पी कॉलोनी येथे फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन, पदपथ यासह रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमाणावर जोरदार कारवाई केली. या कारवाई बद्दल मा. आयुक्त नवलकिशोर राम,उपायुक्त सोमनाथ बनकर, प्रत्यक्ष टीम सह कारवाई करणारे प्रभारी अतिक्रमण निरीक्षक मंदार करंजे या सर्वांचे या प्रभागातील नागरिकांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन. मात्र ही अतिक्रमणं पुन्हा उभी राहू नयेत यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत असे आवाहन क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केले आहे.विशेष म्हणजे या सर्व कारवाई ला स्थानिक नगरसेवक पुनीत जोशी, नगरसेवक सुनील पांडे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व नगरसेविका ऍड. मिताली सावळेकर यांनी देखील या कारवाईस पाठिंबा दर्शविला त्याबद्दल त्यांचे ही अभिनंदन !!
महाराष्ट्राचे विकासपुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पुणे भेटीत वारंवार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप मांडला आहे.त्यांनी स्वच्छ, सुंदर, विकसित पुण्याची कल्पना करताना अतिक्रमण व अनधिकृत फ्लेक्स मुक्त पुण्याचा सातत्याने उच्चार केला आहे. त्यामुळे आता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधिंनी मनपा व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे व "आपलं पुणं" हे सर्वोत्तम शहर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन ही संदीप खर्डेकर यांनी केले आहे. पुणेकरांच्या भावनांचा आदर राखण्याची ही योग्य संधी असून सर्वच लोकप्रतिनिधी त्या दिशेने कार्य करतील असा विश्वास देखील खर्डेकर यांनी व्यक्त केला आहे.