सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या; भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणावर उद्धव ठाकरेंचं परखड भाष्य, मुख्यमंत्र्यांनाही आवाहन
  • मोठी बातमी : सुनेत्रा पवारांची रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर पहिली ॲक्शन, कारवाईला सुरुवात
  • महाराष्ट्रावर 'अवकाळी' संकट, गारपीट अन् पावसाच्या तडाख्यानं उभी पिकं झाली आडवी; पाहणीसाठी गेलेल्या मंत्री आशिष शेलारांपुढं बळीराजाला रडू कोसळलं
  • इराण कडवा प्रतिकार अन् अवघ्या जगाची कोंडी केलेला स्ट्रेट ऑफ होर्मुझ काही केल्या सुरु होईना; आता ट्रम्प यांनी दबावतंत्रासाठी नवीन चाल शोधली!
 राजकारण

गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचा सत्तेचा दावा; महाराष्ट्राच्या प्रश्नांवर थेट भाष्य

डिजिटल पुणे    21-03-2026 13:18:20

पुणे/मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात राज्यातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर जोरदार भाष्य करत भविष्यात सत्ता हस्तगत करण्याचा विश्वास व्यक्त केला. पक्ष स्थापनेच्या २० वर्षांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा “शुभसंकेत” असल्याचे त्यांनी सांगितले.मेळाव्यात बोलताना त्यांनी देश-विदेशातील घडामोडींवरही भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणला साथ द्यायला हवी होती, अन्यथा त्याचा फटका भविष्यात बसू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

राज्यातील परिस्थितीवर टीका करत त्यांनी महाराष्ट्रावर सुमारे ११ लाख कोटींचे कर्ज असल्याचे सांगत शहरांचे नियोजन कोलमडले असल्याचा आरोप केला. कोस्टल रोडसारख्या प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे प्रकल्प स्थानिकांसाठी नसल्याची टीका त्यांनी केली.

तरुण पिढी मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये गुंतली असून इंस्टाग्रामसारख्या माध्यमांपासून बाहेर पडण्याचे आवाहन त्यांनी केले. “डान्स बार बंद झाले, पण आता मोबाईलवरच तेच सुरू आहे,” अशा शब्दांत त्यांनी बदलत्या जीवनशैलीवर भाष्य केले. तसेच राज्यात वाढत्या व्यसनाधीनतेबाबत आणि ड्रग्जच्या वाढत्या प्रमाणाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत राज्यात मुलांचे अपहरण वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मराठी भाषेचा वापर कमी होत असल्याबद्दल खंत व्यक्त करत प्रत्येक राज्य आपली भाषा आणि ओळख जपते, असे त्यांनी सांगितले.इतिहास आणि समाजकार्याचा उल्लेख करत त्यांनी जिजाऊ यांना देशातील पहिली बंडखोर स्त्री म्हटले. तसेच शरद पवार यांनी फळोत्पादन क्षेत्रात मोठे योगदान दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

शेतीत तंत्रज्ञानाच्या वापराचा उल्लेख करत बारामतीमध्ये एआयच्या मदतीने शेतीत होत असलेल्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले. त्याचबरोबर सरकारवर अवलंबून न राहता स्वतः पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.यावेळी “Maharashtra Next” या नव्या वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. या माध्यमातून विकासासाठी नव्या कल्पना मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती