सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या; भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणावर उद्धव ठाकरेंचं परखड भाष्य, मुख्यमंत्र्यांनाही आवाहन
  • मोठी बातमी : सुनेत्रा पवारांची रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर पहिली ॲक्शन, कारवाईला सुरुवात
  • महाराष्ट्रावर 'अवकाळी' संकट, गारपीट अन् पावसाच्या तडाख्यानं उभी पिकं झाली आडवी; पाहणीसाठी गेलेल्या मंत्री आशिष शेलारांपुढं बळीराजाला रडू कोसळलं
  • इराण कडवा प्रतिकार अन् अवघ्या जगाची कोंडी केलेला स्ट्रेट ऑफ होर्मुझ काही केल्या सुरु होईना; आता ट्रम्प यांनी दबावतंत्रासाठी नवीन चाल शोधली!
 DIGITAL PUNE NEWS

भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे: एनबीए मानांकनाने उत्कृष्टतेचा नवा मानबिंदू

डिजिटल पुणे    21-03-2026 15:20:32

पुणे: भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथील कंप्यूटर इंजीनियरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग या पदवी अभ्यासक्रमांना नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशनकडून मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन पुढील तीन वर्षांसाठी वैध असून, संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावरील बांधिलकीची आणि महिला सक्षमीकरणाच्या ध्येयाची ठोस नोंद घेते.

या यशामागे संस्थापक आदरणीय डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांची दूरदृष्टी आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची परंपरा भक्कमपणे उभी आहे. मा. विजयमालाजी कदम, अध्यक्षा, शालेय शिक्षण समिती, भारती विद्यापीठ, मा. डॉ. शिवाजीराव कदम, कुलपती, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, मा. डॉ. विश्वजीत कदम, कार्यवाह, भारती विद्यापीठ तसेच प्र-कुलगुरू, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय आणि मा. डॉ. अस्मिता जगताप, कार्यकारी संचालिका, भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान तसेच  सौ. स्वप्नाली कदम, अध्यक्षा, रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्स यांचे मार्गदर्शन संस्थेच्या प्रगतीला सातत्याने दिशा देत आहे.

या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना मा. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, “महिला अभियांत्रिकी शिक्षणात गुणवत्ता आणि नवोपक्रम यांचा संगम घडवणे हा आमचा ध्यास आहे आणि हे मानांकन त्या प्रयत्नांची पावती आहे.” मा. डॉ. शिवाजीराव कदम यांनी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले शिक्षण आणि शिस्त हीच या यशाची खरी ओळख असल्याचे नमूद केले. मा. डॉ. अस्मिता जगताप यांनी गुणवत्तापूर्ण आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज अधोरेखित करत संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.

संस्थेच्या प्रगतीत सहकार्यवाह म्हणून मा. डॉ. के. डी. जाधव, मा. डॉ. एम. एस. सगरे तसेच मा. श्री. व्ही. बी. म्हेत्रे यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव म्हणाले, “हे मानांकन आमच्या संपूर्ण शैक्षणिक परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. गुणवत्ता आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी आमची बांधिलकी यामुळेच हा टप्पा गाठता आला आहे.”

उपप्राचार्या डॉ. सुवर्णा चोरगे, उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार तसेच विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम, डॉ. दीपाली गोडसे आणि डॉ. संदीप पाटील यांच्या समन्वयपूर्ण नेतृत्वामुळे हे यश मिळवणे शक्य झाले.

महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समर्पण आणि संघभावनेमुळेच हे मानांकन शक्य झाले आहे. विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी केलेले त्यांचे प्रयत्न हीच संस्थेची खरी ताकद आहे. हे मानांकन महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, सक्षम नेतृत्व आणि सातत्यपूर्ण प्रगतीचे प्रतीक ठरले असून, भविष्यातही अशीच यशस्वी वाटचाल सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती