सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार? आता शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांचीही होणार चौकशी
  • सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
  • संतापलेल्या शंभुराज देसाईंनी तुषार दोषींचा ट्रॅक रेकॉर्डच काढला, अंतरवाली सराटीतील लाठीमाराचा मुद्दा उकरुन काढला, वातावरण तापलं
 क्राईम

खळबळजनक: गायक चंदन कांबळेकडून अंधश्रद्धेतून अमानवीय कृत्य; पीडितेला शॉक देऊन वेडे ठरवण्याचा क्रूर कट

डिजिटल पुणे    23-03-2026 10:18:00

​पुणे/आळंदी: पिंपरी-चिंचवडच्या दिघी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. प्रसिद्ध गायक चंदन अदिनाथ कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी एका ४६ वर्षीय महिलेवर केवळ अत्याचारच केला नाही, तर तिला शॉक देऊन वेडे ठरवण्याचा आणि तिची मालमत्ता बळकावण्याचा क्रूर कट रचल्याचे समोर आले आहे.

 

 

 

​अंधश्रद्धा आणि कुप्रथेचा वापर

​पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, आरोपींनी तिला अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढले. पीडितेचे देवाशी लग्न लावून देण्याच्या बहाण्याने तिला फसवण्यात आले आणि आरोपी राजू राजपूत याच्याशी तिचे लग्न लावून दिले. या नावाखाली पीडितेचा अमानवीय छळ करण्यात आला. पीडिता एका भयानक कुप्रथेची शिकार झाली असून, तिच्यावर जादूटोणा आणि अघोरी कृत्यांचा वापर करून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे.

 

 


 Give Feedback



 जाहिराती