सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार? आता शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांचीही होणार चौकशी
  • सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
  • संतापलेल्या शंभुराज देसाईंनी तुषार दोषींचा ट्रॅक रेकॉर्डच काढला, अंतरवाली सराटीतील लाठीमाराचा मुद्दा उकरुन काढला, वातावरण तापलं
 जिल्हा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

डिजिटल पुणे    23-03-2026 12:12:05

नागपूर  : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा पसरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून नागपूरमधील खामला येथील मेघे निवासस्थानी जाऊन दत्ताभाऊ मेघे यांचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यमंत्री अॅड आशिष जयस्वाल, आमदार चरणसिंह ठाकूर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.दत्ताभाऊ मेघे यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी करत ग्रामीण भागात शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे उभे केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर समाजासाठी कार्य करणाऱ्या या लोकनेत्याच्या निधनाने मोठी हानी झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.


 Give Feedback



 जाहिराती