सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार? आता शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांचीही होणार चौकशी
  • सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
  • संतापलेल्या शंभुराज देसाईंनी तुषार दोषींचा ट्रॅक रेकॉर्डच काढला, अंतरवाली सराटीतील लाठीमाराचा मुद्दा उकरुन काढला, वातावरण तापलं
 शहर

पुण्यातील लोहगाव येथे ४८ एकर आरक्षित जागेवर भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचा भाजपचा प्रस्ताव; नागरिकांचा जोरदार विरोध

डिजिटल पुणे    23-03-2026 15:05:45

पुणे :पुण्यात उद्यान, हॉस्पिटल, भाजी मंडई यासाठी आरक्षित असलेल्या 48 एकर जागेवर भारत मंडपम कन्वेक्शन सेंटर उभारण्याचा घाट घालण्यात येतोय. आज महापालिकेत होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रस्ताव दिला जाणार आहे. पुण्यात लोहगाव परिसरातील 48 एकर उद्यान, हॉस्पिटल आणि भाजी मंडईसाठी राखीव असलेल्या जागेवर भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील प्रस्ताव मांडला जाणार आहे.सजग नागरिक मंचाचे सदस्य विवेक वेलणकर यांनी सांगितले की, मूलभूत गरजांसाठी राखीव ठेवलेली ही जागा कन्व्हेन्शन सेंटरसाठी वापरणे चुकीचे ठरेल, आणि त्यांच्याकडून कोर्टातही जाण्याची तयारी आहे.

या प्रकल्पासाठी पाठपुरावा कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी राज्य सरकारकडे केला आहे. मात्र, या परिसराचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बापू पठारे असून, त्यांनी का पाठपुरावा केला याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.संपूर्ण शहरातील नागरिक आणि शहर नियोजनासाठी या जागेचा योग्य वापर करणे आवश्यक असल्याचे वेलणकर यांनी ठळक केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती