सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार? आता शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांचीही होणार चौकशी
  • सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
  • संतापलेल्या शंभुराज देसाईंनी तुषार दोषींचा ट्रॅक रेकॉर्डच काढला, अंतरवाली सराटीतील लाठीमाराचा मुद्दा उकरुन काढला, वातावरण तापलं
 क्राईम

नाशिक: अशोक खरात प्रकरणानंतर सायबर पोलिसांची कडक कारवाई; पीडित महिलांची बदनामी थांबवण्यासाठी मोठा निर्णय

डिजिटल पुणे    23-03-2026 15:56:23

नाशिक – नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर पीडित महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी  कडक भूमिका घेतली आहे. पीडित महिलांची बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर पीडित महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिक सायबर पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. पीडितांची बदनामी करणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सध्याच्या तपासात असे दिसून आले आहे की काही फोटो सोशल मीडियावर मॉर्फ किंवा AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनावट स्वरूपात प्रसारित केले जात आहेत. सायबर पोलिस या सर्व पोस्ट्सवर लक्ष ठेवत असून, चुकीच्या फोटो आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तयारी केली जात आहे. यामध्ये फक्त पीडित महिलाच नाही, तर इतर निरपराध महिलांचेही फोटो चुकीच्या पद्धतीने वापरले जात असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही प्रकारे बदनामीकारक मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांविरोधात थेट गुन्हा नोंदवला जाईल. तसेच, पीडित आणि तक्रारदारांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा, चुकीची माहिती आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्सवरही सतत लक्ष ठेवले जात आहे, जेणेकरून प्रकरणाची संवेदनशीलता कायम राहील.

दरम्यान, अशोक खरातची सोमवारी (दि. 23) एसआयटीकडून तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू आहे. विशेष तपास पथक प्रमुख तेजस्विनी सातपुते स्वतः चौकशी करत आहेत. काल रात्रीही नाशिक क्राईम ब्रँचने खरातची तपासणी केली होती. आतापर्यंत अशोक खरातविरुद्ध नाशिक सरकारवाडा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष तपास पथक आणि क्राईम ब्रँच या प्रकरणातील सर्व काळे कारनामे उघडकीस आणण्यासाठी सखोल तपास करत आहेत.एकूणच, अशोक खरात प्रकरणात केवळ तपासावरच नाही तर सोशल मीडिया मॉनिटरिंगवरही भर देण्यात आला आहे, जेणेकरून पीडित महिलांच्या सन्मानाचे रक्षण होऊ शकेल.


 Give Feedback



 जाहिराती