सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
  • इराण-अमेरिका तणाव पुन्हा टोकाला; ट्रम्प यांची बॉम्बहल्ल्याची चेतावणी, इराणच्या दोन अटींना नकार
  • तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतील ‘शक्तिवर्धक मध’, एक किलोची बाटली 9 लाखांना विकून भाविकांना गंडा; अशोक खरातचा आणखी एक कारनामा
 शहर

किवळेत सकल हिंदूंची वज्रमूठ; सकल हिंदू संमेलनात उसळला जनसागर;'हिंदू' ही जीवनपद्धती - सिनेअभिनेते योगेश सोमण

डिजिटल पुणे    24-03-2026 10:42:26

किवळे : हिंदुत्व ही आपली जीवनपद्धती असून सकल हिंदूंनी आपली संस्कृती समजून घेऊन ती जोपासण्याचे आवाहन सुप्रसिद्ध सिनेअभिनेते, व्याख्याते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी केले ते पिंपरी चिंचवड शहरातील के विले सोसायटी समोरील आठवडी बाजार मैदानावर आदर्शनगर - बापदेवनगर भागात सकल हिंदू समाज किवळे आयोजित विराट हिंदू संमेलनात बोलत होते. यावेळी संस्कृती संवर्धन विकास महासंघाचे कार्याध्यक्ष योगाचार्य डॉ.अजित जगताप, घोरावडेश्वर प्रासादिक दिंडीचे ह.भ.प.मुकुंद नाना राऊत महाराज,इस्कॉन धाम रावेतचे जदभारत दास महाराज यांनी मार्गदर्शन केले.

पुढे बोलतांना योगेश सोमण यांनी विविध उदाहरणे देऊन जातीपाती विसरून हिंदू म्हणून एकत्रित येण्याची गरज विषद केली.आपण कायम इतिहासाची आठवण ठेवून भविष्याचा वेध घेतला पाहिजे. शिवछत्रपतींचे गडकिल्ले तसेच क्रांतिकारकांची स्मारकांना  आपण दरवर्षी सहकुटुंब भेट देऊन प्रेरणा घेतली पाहिजे. तरुणांनी हिंदू धर्म संस्कृती जोपासण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असून महिला भगिनी,तरुणी यांनी हिंदू धर्म अस्मितेसाठी जागृत होऊन, हिंदू धर्माची खोटी शाल पांघरून फसविणाऱ्यांना वेळीच ओळखून सावध होण्याचा इशाराही त्यांनी दिला. योगाचार्य डॉ.अजित जगताप यांनी संस्कारी कुटुंबव्यवस्था मजबूत राष्ट्र बनवत असल्याचे सांगून मंदिरे ही संस्कार केंद्रे आहेत मंदिरांनी उत्तम शिक्षण देणाऱ्या शाळा काढायला हव्या असे आवाहनही केले. त्यांनी पर्यावरण, स्व भाषा, स्वभाषा, स्वभजन, स्वभ्रमण, सामाजिक समरसता या बाबींवर प्रकाश टाकला. घोरवडेश्वर प्रासादिक दिंडीचे ह.भ.प.मुकुंद नाना राऊत महाराज यांनी १६ संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार आहे. नव्या पिढीने विवाहाचा अर्थ समजून घेऊन आदर्श पती पत्नी होऊन संस्कारी कुटुंब उभे करण्याचे आवाहन केले. जदभारतदास महाराज यांनी प्रत्येक परिसरात अशा प्रकारच्या समस्त हिंदू समाजाच्या एकत्रीकरणाची आवश्यकता असल्याचे सर्व धार्मिक संस्था, सामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन धर्मकार्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावेळी नगरसेवक निलेश तरस, बापूसाहेब कातळे, नगरसेविका सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस, राजेंद्र तरस, नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, नरेंद्रनाथ महाराज भक्त परिवार, स्वाध्याय परिवार, समर्थ बैठक परिवार, आर्ट ऑफ लिविंग, पतंजली परिवार,बापदेव महाराज ट्रस्ट, जेष्ठ नागरिक संघाचे सभासद उपस्थित होते.

महिला भजनी मंडळे दिंडीद्वारे संमेलनस्थानी पोहोचले.नादवेध संगीत अकादमीच्या शर्मिला शिंदे, निलेश शिंदे यांच्यासह चमूने सादर केलेल्या गीतांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली तर भावना सामंत, पद्मिनी सोनवणे, स्वरेशा पोरे कुलकर्णी यांच्या चमूने बहारदार सादरीकरण केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सांस्कृतिक वार्तापत्राच्या संघ यात्रा या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला परिसरातील हिंदू बांधव भगिनी हजारोंच्या संख्येत उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती