सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पु ल देशपांडे यांच्यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 'कोट्या'धीश, त्यांच्या कोट्या पुन्हा ऐकायला मिळोत; फडणवीसांकडून ठाकरेंचं कौतुक
  • मोठी बातमी : भोंदूबाबा अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
  • देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
  • इराण-अमेरिका तणाव पुन्हा टोकाला; ट्रम्प यांची बॉम्बहल्ल्याची चेतावणी, इराणच्या दोन अटींना नकार
  • तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतील ‘शक्तिवर्धक मध’, एक किलोची बाटली 9 लाखांना विकून भाविकांना गंडा; अशोक खरातचा आणखी एक कारनामा
 DIGITAL PUNE NEWS

पहिल्याच प्रयत्नात CA फायनल उत्तीर्ण; पाषाणमधील तरुणाच्या यशाने समाजात कौतुकाचा वर्षाव

डिजिटल पुणे    24-03-2026 16:12:45

पुणे : पुण्यातील पाषाण परिसरातील सोमेश्वरवाडी येथे राहणाऱ्या सिद्धेश कल्याणी राजेंद्र लांबाते यांनी अत्यंत कठीण समजली जाणारी सीए फायनल परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत आणि घरात कोणतीही शैक्षणिक किंवा व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, याचे जिवंत उदाहरण सिद्धेश यांनी समाजासमोर ठेवले आहे. जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या सीए फायनल परीक्षेत दोन्ही गटांसाठी बसलेल्या २२,२९३ विद्यार्थ्यांपैकी केवळ २,४४६ विद्यार्थ्यांनाच यश मिळाले, त्यामध्ये सिद्धेश लांबाते यांनीही चांगल्या गुणांसह यश संपादन केले

 

सिद्धेश यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांनी शिक्षण घेतलेल्या मॉडर्न हायस्कूल प्राथमिक व माध्यमिक विभाग तसेच लॉ कॉलेज, शिवाजीनगर येथे त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

 

 

याशिवाय भारतीय मौसम विभाग (हवामान खाते) शिवाजीनगर कार्यालयातील युनियनतर्फेही सिद्धेश यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच स्थानिक नगरसेवक सनी निम्हण, प्रमोद अण्णा निम्हण, जयेश मुरकुटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या सिद्धेश लांबाते यांच्या यशामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या या यशकथेमुळे अनेक विद्यार्थ्यांना नवे बळ आणि प्रेरणा मिळत आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती