सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पु ल देशपांडे यांच्यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 'कोट्या'धीश, त्यांच्या कोट्या पुन्हा ऐकायला मिळोत; फडणवीसांकडून ठाकरेंचं कौतुक
  • मोठी बातमी : भोंदूबाबा अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
  • देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
  • इराण-अमेरिका तणाव पुन्हा टोकाला; ट्रम्प यांची बॉम्बहल्ल्याची चेतावणी, इराणच्या दोन अटींना नकार
  • तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतील ‘शक्तिवर्धक मध’, एक किलोची बाटली 9 लाखांना विकून भाविकांना गंडा; अशोक खरातचा आणखी एक कारनामा
 राजकारण

वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ उबाठांमुळे काँग्रेसचा गुलाम;भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

डिजिटल पुणे    24-03-2026 17:30:51

मुंबई  : वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या वेळचा ढाण्या वाघ आता उद्धव ठाकरे आणि राऊतांच्या कारकीर्दीत वाघाचे कातडे पांघरून काँग्रेसचा गुलाम झाला आहे. खुर्चीसाठी उद्धव सेना काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर झालेले मतदारांनी पाहिल्यामुळेच, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये उबाठा गटाला मतदारांनी घरी बसवले. राऊतांनी इतरांना मांजर म्हणण्याच्या फंदात न पडता उबाठा गटाचे झालेले मातेरे सावरावे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवेळी जे काही झाले ते हाताळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती समर्थ आहे, राऊतांना त्यात नाक खुपसण्याची गरज नाही. लोकशाहीच्या गप्पा राऊतांनी मारूच नये त्यांना तो अधिकारच नाही असे श्री. बन यांनी खडसावले. साता-यामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असताना काही लोकांनी जाणूनबुजून वेगळ्या पक्षांशी संगनमत करण्याचा प्रयत्न केला. त्यातून हे प्रकरण घडले असे ते म्हणाले.

महायुतीची चिंता करणा-या राऊतांना खडे बोल सुनावत श्री. बन म्हणाले की राऊतांनी उबाठा गटातील गटातटाचे राजकारण, उद्धव ठाकरे आणि खुद्द राऊत यांच्यातील संघर्ष मिटवण्याकडे लक्ष द्यावे. ज्यांना स्वत:च्या पक्षातील भांडणे, तंटे, संघर्ष सोडवता येत नाहीत त्यांनी महायुतीच्या अस्तित्वाची चिंता करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती भक्कम असून कोणीही त्याला खिंडार पाडू शकत नाही असेही त्यांनी नमूद केले. 

यावेळी श्री. बन म्हणाले की, महायुती सरकार हे 11 कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे स्पष्ट बहुमताने आलेले सरकार आहे, पाठीत खंजीर खुपसून, विश्वासघात करून आलेल्या मविआ सरकारसारखे नाही. मविआ सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे, राऊतांना सचिन वाझे तसेच अनेक अट्टल गुन्हेगारांना पाठीशी घालावे लागले होते. महायुती सरकार भरभक्कम असून सरकार टिकवण्यासाठी कुणालाही पाठीशी घालण्याची गरज भासत नाही. 

सध्याच्या युद्धस्थितीमुळे निर्माण झालेला गॅस आणि इंधन तुटवड्याच्या समस्येकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील एनडीए आणि महायुती सरकार डोळ्यात तेल घालून बघत असून ती समस्या सोडवण्यासाठी युद्धस्तरावर काम करत आहेत. साठेबाजांवर, काळाबाजार करणा-यांवरही कठोर कारवाई केली जात आहे. कोणावरही रिकामे गॅस सिंलेंडर वाजवायची वेळ येणार नाही. राज्यातील सूज्ञ जनतेने मात्र वेळोवेळी झालेल्या निवडणुकांमध्ये उबाठा गटाला योग्य जागा दाखवत केवळ टाळ्या वाजवण्याचे काम राऊतांसाठी शिल्लक ठेवले आहे या शब्दांत श्री. बन यांनी खिल्ली उडवली. 

फुटकळ टीका करण्यापेक्षा राऊतांनी पायाखाली काय जळतेय ते पहावे. देशामध्ये शांती आहे मात्र उबाठा गटात संजय राऊत आणि आदित्य ठाकरे या दोन गटात पेटलेले युद्ध राऊतांनी आधी शमवावे आणि मग इराण इस्रायल युद्धाचे भारतावर उमटलेल्या पडसादांबद्दल मोदी सरकार, महायुती सरकारला शहाजोग सल्ले द्यावे असे श्री. बन  यांनी सुनावले. संपूर्ण जगाला युद्धाच्या झळा बसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे भारताला झळा जाणवल्या नाहीत. अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या असल्यातरी भारतात मात्र किमती आवाक्यात ठेवू शकलो कारण, देशाची काळजी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थ आहेत असे ही ते म्हणाले.

 


 Give Feedback



 जाहिराती