उरण : महिला दिनाचे औचित्य साधून स्टे फाईन ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या वतीने आणि डीएस एंटरटेनमेंट (टीम दीपक शेट्टी) यांच्या नियोजनाखाली आयोजित 'नारी गौरव सन्मान २०२६' आणि 'हळदी-कुंकू सोहळा' मुंबईतील मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला.राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या महिलांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.
स्टे फाईन ग्रुप ऑफ कंपनीज (स्टेफाईन सुपरमार्ट) यांनी उत्तम आयोजन केले होते.उत्तम नियोजन व अंमलबाजवणी दीपक शेट्टी टीम व डीएस एंटरटेनमेंट ने केले होते.कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर महिला उपस्थित होत्या, ज्यात मीनाक्षीताई शिंदे (माजी महापौर), भक्तीताई भोसले, जयंती उल्लाल आणि माधुरी जे. सुतार यांचा समावेश होता.
ज्या महिलांनी आपल्या नेतृत्वाने आणि कार्यकर्तृत्वाने समाजासमोर आदर्श ठेवला आहे, अशा निवडक महिलांना 'प्राईड ऑफ विमेन अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने ॲड. प्राजक्ता नंदकुमार देशमुख आणि भारती शेवाळे, सारीका अष्टेकर, आरती बेहरा यांच्यासह इतर मान्यवर महिलांचा समावेश होता.या कार्यक्रमात नारी शक्ती संघटनेचे नॅशनल सेक्रेटरी ज्ञानेश्वर सोनावणे, माजी प्राचार्य अरुण घाग यांचीही विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन स्टे फाईन परिवाराचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुरजकुमार कुंभार, मोहिनी पुजारी, आणि प्रकाश दसूरी व जिग्रा भिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पुरस्कार प्रदान न करता, सर्व उपस्थित महिलांसाठी 'हळदी-कुंकू' समारंभाचे आयोजन करून भारतीय संस्कृतीची जोपासना करण्यात आली. तसेच उपस्थित सर्व महिलांना स्टे फाईन परिवारातर्फे विशेष भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमात महिला सामाजिक कार्यकर्त्या आरती बेहरा यांच्या कार्याचे, संघटनेचे कौतुक करत त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आले.आरती बेहरा यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आरती बेहरा यांच्या विषयी थोडक्यात माहिती.:-
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी कार्यरत असलेल्या व महिलांचे संघटन करून महिलांच्या विविध समस्यावर उपाययोजना करून जनजागृती करणाऱ्या राष्ट्रीय नारी शक्ती महिला संघटन व ट्रस्ट असोसिएशनच्या वतीने संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी नेहमी विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांच्या प्रत्येक समस्यावर आवाज उठविण्यात येते अशा या राष्ट्रीय नारी शक्ती महिला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आरती बेहरा हे कामकाज पाहत आहेत. महिलांचा सर्वांगीण विकास व हक्क यावर राष्ट्रीय नारी शक्ती महिला संघटना व ट्रस्ट असोसिएशन ही सरकार सोबत काम करत आहे.
महिलांना विविध माहिती देऊन महिलांचे प्रबोधन करण्यात येते.संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक आरोग्य शिबीरे, महिला मेळावे घेऊन महिलांना एक प्रकारे आधार दिला.उत्तम अनुभवी व महिला समस्येच्या जाणकार असलेल्या राष्ट्रीय अध्यक्ष आरती बेहरा यांनी केलेल्या मार्गदर्शन मुळे महिलांमध्ये जनजागृती होऊन अनेक महिला स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत. त्यांच्या कार्यामुळे महिला मध्ये मोठया प्रमाणात जनजागृती होत आहे.देशात सर्वत्र फिरून आरती बेहरा या महिलांच्या समस्यांना न्याय देत आहेत.आजपर्यंत १७ लाख, ६८ हजार,३८ महिला या आरती बेहरा यांच्यामुळे नारी शक्ती महिला संघटनेशी जॉईन झाल्या आहेत.