सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धक्कादायक! डोळ्यादेखत चार एक गव्हाची झाली राखरांगोळी, शेतकऱ्याने फोडला टाहो, परभणीतील शेतकऱ्याला मोठा फटका
  • 'सरकारने खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री तुरुंगात जातील’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
  • इच्छामरणाच्या परवानगीनंतर 31 वर्षीय हरीश राणा अनंतात विलीन; वडील हात जोडून म्हणाले, 'अजिबात रडायचं नाही, माझ्या मुलाला..' जातानाही अवयवदान करत 6 जणांना 'आयुष्य' देत गेला
  • रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
 DIGITAL PUNE NEWS

आंध्र प्रदेशात भीषण अपघात: ट्रॅव्हल बस डंपरला धडकली, 13 जणांचा मृत्यू; 22 जखमी

डिजिटल पुणे    26-03-2026 15:49:23

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यातील रायवरम परिसरात आज पहाटे भीषण रस्ता अपघात झाला. खासगी ट्रॅव्हल बसने डंपरला जोरदार धडक दिल्यानंतर बसला आग लागली आणि त्यात 13 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिकृष्णा ट्रॅव्हल्सची बस तेलंगणातील निर्मल येथून नेल्लोरकडे निघाली होती. पहाटे सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. धडकेनंतर बसने पेट घेतला आणि आग विझवण्यासाठी जवळपास तीन तास लागले.

या अपघातात डंपर चालकासह 22 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये एकूण 35 प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती