सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • लॉकडाऊनच्या अफवा फेटाळल्या; राज्यात इंधनाचा पुरेसा साठा;फेक व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांवरही होणार कायदेशीर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट माहिती
  • धक्कादायक! डोळ्यादेखत चार एक गव्हाची झाली राखरांगोळी, शेतकऱ्याने फोडला टाहो, परभणीतील शेतकऱ्याला मोठा फटका
  • 'सरकारने खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री तुरुंगात जातील’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
  • इच्छामरणाच्या परवानगीनंतर 31 वर्षीय हरीश राणा अनंतात विलीन; वडील हात जोडून म्हणाले, 'अजिबात रडायचं नाही, माझ्या मुलाला..' जातानाही अवयवदान करत 6 जणांना 'आयुष्य' देत गेला
  • रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
 जिल्हा

लाडक्या बहिणींना दिलासा! फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; २-३ दिवसांत खात्यात पैसे

डिजिटल पुणे    27-03-2026 17:38:26

मुंबई : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधीची प्रतीक्षा आता संपली आहे. राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ ते ७२ तासांत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार-लिंक बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे राज्यातील कोट्यवधी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली असून, पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. विशेषतः ज्या महिलांचे बँक खाते आधारशी संलग्न आहे आणि ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशा लाभार्थींना प्राधान्याने निधी मिळत आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल.

दरम्यान, योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत त्रुटी राहिलेल्या महिलांना दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. ही मुदत ३१ मार्चपर्यंत असल्याने अद्याप दुरुस्ती न केलेल्या लाभार्थींनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती