सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुन्हा इंधनदरांचा भडका! पेट्रोल-डिझेल महागले; 10 दिवसांत चौथी वाढ, मुंबईत पेट्रोल 111 रुपयांच्या पार
 DIGITAL PUNE NEWS

रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे निधन; उद्योगविश्वात शोककळा

डिजिटल पुणे    30-03-2026 10:37:45

पुणे  : रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष तसेच पद्मभूषण सन्मानित एअर कमोडोर (डॉ.) विजयपत सिंघानिया यांच्या निधनाची बातमी समोर आली असून उद्योगविश्वात शोककळा पसरली आहे. उद्योग, विमानचालन क्षेत्र आणि सामाजिक कार्यात त्यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.

विजयपत सिंघानिया हे शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि दूरदृष्टी असलेले उद्योगपती म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या नेतृत्वाखाली रेमंड समूहाने देश-विदेशात आपली वेगळी ओळख निर्माण केली. विशेषतः वस्त्रोद्योग क्षेत्रात त्यांनी केलेली प्रगती उल्लेखनीय ठरली.

विदर्भाच्या औद्योगिक विकासातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली. उद्योगवृद्धीसोबतच सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबवून त्यांनी समाजासाठीही कार्य केले. त्यांच्या कार्यामुळे अनेक तरुण उद्योजकांना प्रेरणा मिळाली.त्यांच्या निधनाने उद्योगक्षेत्राने एक दूरदृष्टी असलेले आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी प्रार्थना व्यक्त करण्यात येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती