सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; मुंबईत आज हलक्या सरी, पुणे, सातारा, नाशिकमध्ये गारपिटीची शक्यता
  • आखाती तणावाचा परिणाम! व्यावसायिक LPG सिलेंडर महाग; देशभरात दरवाढीचा फटका
  • मोठी बातमी: अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, गर्दीतून पोहोचलेला खरात 5 मिनिटात कोर्टरुममधून बाहेर!
 जिल्हा

आईच्या कुशीतून 2 महिन्यांच्या बाळाला जंगली प्राण्याने उचललं; जळगावच्या चोपड्यात थरारक घटना, गावात भीतीचं वातावरण

डिजिटल पुणे    01-04-2026 11:01:47

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, रात्री आईजवळ झोपलेल्या अवघ्या दोन महिन्यांच्या बालिकेला अज्ञात जंगली प्राण्याने उचलून नेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे.

माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील मामलदे परिसरात परराज्यातील गुराखी आपल्या गुरांसह मुक्कामी आहेत. त्यांच्याच कुटुंबातील ध्रुवी विपुल बरवाड ही बालिका रात्री आईच्या कुशीत झोपलेली असताना अचानक जंगली प्राण्याने तिला उचलून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांसह गावकऱ्यांमध्ये एकच हळहळ पसरली.या भागात यापूर्वीही बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्यांच्या हालचाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे या घटनेमागे अशाच एखाद्या प्राण्याचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, घटनेची नोंद चोपडा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी वन विभागाने तातडीने कारवाई करून संबंधित प्राण्याचा शोध घ्यावा, अशी मागणी केली आहे.या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून लहान मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती