सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; मुंबईत आज हलक्या सरी, पुणे, सातारा, नाशिकमध्ये गारपिटीची शक्यता
  • आखाती तणावाचा परिणाम! व्यावसायिक LPG सिलेंडर महाग; देशभरात दरवाढीचा फटका
  • मोठी बातमी: अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, गर्दीतून पोहोचलेला खरात 5 मिनिटात कोर्टरुममधून बाहेर!
 क्राईम

नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; अवघ्या 5 मिनिटांत कोर्टात सुनावणी पूर्ण

डिजिटल पुणे    01-04-2026 12:10:48

नाशिक : नाशिकमधील चर्चित भोंदूबाबा अशोक खरात याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बुधवारी (1 एप्रिल) त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश बी. एन. इचपुराणी यांच्या समोर ही सुनावणी पार पडली.

खरातची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात सादर करण्यात आले. विशेष तपास पथक (SIT) सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याची माहिती आहे. तसेच, त्याच्याविरोधात नवीन तक्रारीही सातत्याने दाखल होत आहेत.

सरकारी बाजूने कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सुनावणीदरम्यान सविस्तर युक्तिवाद न होता न्यायालयाने थेट निर्णय देत खरातला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. संपूर्ण प्रक्रिया अवघ्या पाच मिनिटांत पूर्ण झाली आणि त्यानंतर खरात कोर्टरूममधून बाहेर पडला.

सुनावणीतील घडामोडी:

तपास अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी न्यायालयात उपस्थित

सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी बाजू मांडली

न्यायालयाने कागदपत्रांची तपासणी केली

युक्तिवाद न होता थेट आदेश

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

प्रकरणाची पार्श्वभूमी:

अशोक खरात याच्याविरोधात नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल आहे. एका महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 18 मार्च रोजी पहाटे गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले होते.

खरात कोण आहे?

अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर तो अंकशास्त्रज्ञ आणि कॉस्मॉलॉजी सल्लागार म्हणून प्रसिद्ध झाला. विविध क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, या गंभीर आरोपांमुळे त्याच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


 Give Feedback



 जाहिराती