सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
  • राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; मुंबईत आज हलक्या सरी, पुणे, सातारा, नाशिकमध्ये गारपिटीची शक्यता
  • आखाती तणावाचा परिणाम! व्यावसायिक LPG सिलेंडर महाग; देशभरात दरवाढीचा फटका
  • मोठी बातमी: अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, गर्दीतून पोहोचलेला खरात 5 मिनिटात कोर्टरुममधून बाहेर!
 DIGITAL PUNE NEWS

राजकारणात परस्परांवर आरोप-प्रत्यारोप टाळा; अशोक खरात प्रकरणातून सर्वांनी धडा घ्यावा – अदिती तटकरे

डिजिटल पुणे    01-04-2026 16:49:23

मुंबई : महाराष्ट्र हा पुरोगामी आणि विकसित राज्य म्हणून ओळखला जातो. अशोक खरात प्रकरण हे निंदनीय आहे, त्यामध्ये कोणीही त्याची बाजू घेण्याचे किंवा समर्थन करण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय नेत्याने अशोक खरात प्रकरणाचे समर्थन केलेले नाही. किंबहुना हे प्रकरण महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय मंडळींसाठी एक धडा आहे. आपण पुरोगामी महाराष्ट्रात वावरत असताना कुठलाही सल्ला घेणे किंवा भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी धडा आहे, असे वक्तव्य राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. 

राज्यातील राजकीय नेत्यांनी एकमेकांची बदनामी करण्याऐवजी महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जपण्याची गरज असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केले. अशोक खरात प्रकरण अत्यंत निंदनीय असून त्याचे कोणत्याही स्तरावर समर्थन होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तटकरे म्हणाल्या की, खरातसोबत विविध राजकीय नेत्यांचे फोटो असले तरी त्याचा अर्थ संबंधित नेत्यांनी त्याला पाठिंबा दिला, असा होत नाही. अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भेटी होतात, पण त्यातून समर्थनाचा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. सध्या काहीजण विनाकारण एकमेकांवर आरोप करत असून ही प्रवृत्ती योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले.

या प्रकरणात महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने समर्थन केलेले नाही, उलट हे प्रकरण सर्वांसाठीच एक धडा आहे. जर खरातबाबत पूर्वी माहिती असती, तर कोणताही राजकारणी त्याच्याशी संबंध ठेवला नसता, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केल्याचे तटकरे यांनी नमूद केले. महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून, मुख्यमंत्र्यांची भूमिका हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणावर भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेबाबत बोलताना तटकरे यांनी आपल्या वडिलांची,सुनील तटकरे यांची भूमिका योग्य असल्याचे सांगितले.शरद पवार गटामध्ये या विषयावर संघटित चर्चा झाली होती, मात्र त्यांच्या पक्षात अशी चर्चा झाली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या अस्तित्वात आणि त्यांच्या पश्चात विलीनीकरण या दोन वेगळ्या बाबी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. तसेच, विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबत कोणीही ठाम भूमिका घेतली नव्हती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.एकूणच, अशोक खरात प्रकरणामुळे राजकीय व सामाजिक स्तरावर आत्मपरीक्षणाची गरज असून, जबाबदारीने वागण्याची वेळ आल्याचे तटकरे यांनी अधोरेखित केले.


 Give Feedback



 जाहिराती