सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: ठाकरेंचे खासदार शिंदेसेनेच्या डिनरला हजर; दोन खासदारांच्या उपस्थितीने ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय!
  • अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्नी कल्पना दोन दिवसांपासून बेपत्ता, SIT समोर मोठे आव्हान
 क्राईम

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे; महिलांना गुंगीची औषधे देऊन अत्याचाराचा आरोप

डिजिटल पुणे    02-04-2026 11:18:28

नाशिक :  नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात चौकशीदरम्यान गंभीर आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा सखोल तपास करत असून काही डॉक्टरांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळते.

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित आरोपीने काही डॉक्टरांच्या सल्ल्याने महिलांना गुंगी आणणारी औषधे तसेच वेदनाशामक गोळ्या दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या औषधांचा वापर करून महिलांवर अत्याचार केल्याचा आरोपही समोर आला आहे. तसेच एका प्रकरणात पीडित महिला गर्भवती झाल्यानंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचेही तपासात उघड झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणातील एका तक्रारीनुसार, धार्मिक विधी आणि भविष्य सांगण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलांशी जवळीक साधत त्यांना जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे. लग्नाचे आमिष दाखवून तसेच अंधश्रद्धेचा आधार घेत पीडितेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

तपासादरम्यान आर्थिक व्यवहारांबाबतही मोठे खुलासे झाले आहेत. गेल्या काही वर्षांत आरोपीने मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केल्याचे आढळले आहे. नाशिकसह पुणे आणि अहिल्यानगरमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. बहुतेक व्यवहार रोख रकमेने केल्याचा संशय असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.सध्या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील सुनावणीदरम्यान तपास यंत्रणा महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर सादर करण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती