सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा कहर! साताऱ्यात गारांच्या तडाख्यानं सोलर पॅनल्स फुटले, करच्या काचांना तडे; बळीराजा दुहेरी संकटात, विदर्भ-मराठवाड्यालाही पावसानं झोडपलं
  • पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद; एप्रिल महिन्यात एका दिवसात झाला सर्वाधिक पाऊस
 जिल्हा

कोप्रोली ग्रामस्थांनी काळे पिवळे मार्किंग पट्टे जाळून एमएमआरडीए व राज्य सरकारचा केला निषेध

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    03-04-2026 10:50:26

उरण : एमएमआरडीएने उरण तालुक्यातील कोप्रोली गावच्या वेशीवर काळे पिवळे चौकटीत मार्किंगला केले होते. गुरुवार दिनांक २.४.२०२६ रोजी कोप्रोली ग्रामस्थ व सर्व पक्षांचे प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येत या मार्किंगला काळे फासून निषेध केला.  उपस्थितांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा तीव्र निषेध करत या मार्किंगवर टायर जाळून सरकार आणि एमएमआरडीएला इशारा दिला आहे. “जमीन, घर आणि गाव वाचवा एमएमआरडीए हटवा” “जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची “ असे नारे देत शेती घरे आणि गाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी एल्गार केला आहे.     तत्पूर्वी एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीचे सरचिटणीस रुपेश पाटील यांनी सरकारने तिसऱ्या मुंबईसाठी जाहीर केलेल्या भूसंपादनाच्या शासन निर्णयाची माहिती दिली. सरकारचे धोरण फसवे आणि शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याला बळी पडू नये. 

आपण संघटीत राहून संघर्ष केला नाही तर भविष्यात आपली मूळ गावठाणाबाहेरील घरेही बेकायदेशीर ठरतील. सरकारने या सर्व घरांना सनद ( प्रॉपर्टी कार्ड ) देऊन सुरक्षित करावे तसेच मूळ गावठाणाबाहेर ५०० मिटर पर्यंत गावठाण क्षेत्र जाहीर करावे. एमएमआरडीएने गावोगावी अशा प्रकारचे मार्किंग करून हद्दी निश्चित करत बेकायदेशीरपणे सर्वेक्षण सुरू केलं आहे. त्याला सर्वत्र विरोध होत आहे. याप्रसंगी समितीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर ठाकूर, एड. पर्जन्य म्हात्रे, विपुल म्हात्रे, शशिकांत पाटील, प्रवीण म्हात्रे, अमेय पितळे, दिलीप म्हात्रे, हितेश म्हात्रे, अमृत म्हात्रे, निलेश म्हात्रे, धनेश म्हात्रे, अनिकेत ठाकूर, ओमकार गावंड, हर्षद पाटील, ओंकार म्हात्रे, सौरव पाटील, नमोद म्हात्रे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 


 Give Feedback



 जाहिराती