सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा कहर! साताऱ्यात गारांच्या तडाख्यानं सोलर पॅनल्स फुटले, करच्या काचांना तडे; बळीराजा दुहेरी संकटात, विदर्भ-मराठवाड्यालाही पावसानं झोडपलं
  • पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद; एप्रिल महिन्यात एका दिवसात झाला सर्वाधिक पाऊस
 DIGITAL PUNE NEWS

‘राजा शिवाजी’ चित्रपटात अभिषेक बच्चनची दमदार एन्ट्री; ऐतिहासिक भूमिकेमुळे चर्चेला उधाण

डिजिटल पुणे    04-04-2026 15:53:38

मुंबई: जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी यांच्या निर्मितीत साकारत असलेला ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत जोरदार चर्चेत आहे. दिग्दर्शक म्हणून रितेश देशमुख यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या सिनेमात अभिषेक बच्चनची एन्ट्री विशेष ठरत आहे. विशेष म्हणजे, अभिषेकचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या चित्रपटात अभिषेक बच्चन छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजी शहाजी राजे भोसले यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. इतिहासातील तुलनेने कमी चर्चेत असलेल्या या व्यक्तिमत्त्वाला मोठ्या पडद्यावर नव्या पद्धतीने साकारले जाणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’च्या फर्स्ट लूक टीझरला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. अभिषेकचा योद्ध्याच्या वेशातील प्रभावी लूक, भव्य युद्धदृश्ये आणि भावनिक प्रसंग यामुळे हा चित्रपट केवळ ॲक्शनपुरता मर्यादित नसून, नातेसंबंध आणि इतिहासाचा सखोल पट मांडणारा ठरणार असल्याची झलक मिळते.

या प्रकल्पाबद्दल बोलताना अभिषेक बच्चनने आनंद व्यक्त करत सांगितले की, मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची ही त्याच्यासाठी खास संधी आहे. रितेश देशमुख यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचे स्वप्न अनेक वर्षांपासून असल्याचेही त्याने नमूद केले. त्यांच्या मैत्रीची सुरुवात ‘जमीन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती आणि तेव्हापासून दोघांमध्ये घट्ट नातं निर्माण झालं.

संगीतकार अजय-अतुल यांचे संगीत आणि प्रसिद्ध छायाचित्रकार संतोष सिवन यांचे छायांकन या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेण्यास मदत करत आहे. तसेच संजय दत्त, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौजही या सिनेमात दिसणार आहे.

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी मराठीसह हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, इतिहास आणि भव्यतेचा संगम असलेला हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक खास अनुभव ठरण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती