सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा कहर! साताऱ्यात गारांच्या तडाख्यानं सोलर पॅनल्स फुटले, करच्या काचांना तडे; बळीराजा दुहेरी संकटात, विदर्भ-मराठवाड्यालाही पावसानं झोडपलं
  • पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद; एप्रिल महिन्यात एका दिवसात झाला सर्वाधिक पाऊस
 क्राईम

पत्नीच्या इंस्टाग्राम चॅटवरून संताप; पतीकडून भररस्त्यात मारहाण, फॉर्च्यूनरने चिरडण्याचा प्रयत्न

डिजिटल पुणे    04-04-2026 16:07:44

नाशिक : नाशिक शहरात भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्नीच्या सोशल मीडियावरील चॅटवरून संशय घेत पतीने तिच्यावर अमानुष अत्याचार करत थेट गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय पीडित महिला आपल्या पतीसोबत महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथे आधार कार्डवरील दुरुस्तीसाठी गेली होती. यावेळी पतीने तिचा मोबाईल तपासला असता इंस्टाग्रामवरील चॅट पाहून तो संतापला. त्यानंतर त्याने पत्नीवर शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.

प्रकरण इतक्यावर न थांबता आरोपीने पत्नीला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. गाडी सुरू असतानाही तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवत जीवे मारण्याची धमकी दिली. भीतीने ग्रस्त झालेल्या महिलेने चालत्या गाडीतून उडी मारून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

यानंतर संतप्त पतीने रस्त्यावर पळणाऱ्या पत्नीचा पाठलाग करत तिच्यावर कार घालण्याचा प्रयत्न केला. जोरदार धक्का लागल्याने ती गंभीर जखमी झाली, मात्र सुदैवाने तिचा जीव वाचला. घटनेनंतर नागरिकांनी धाव घेतली असता आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

या प्रकरणी पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती