सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • e मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
  • इराण-अमेरिका युद्ध थांबताच शेअर बाजारात सर्वात मोठी उसळी, सेन्सेक्स 2500 अंकांनी वधारला, निफ्टीचा वरच्या दिशेने सुस्साट प्रवास
  • युद्धविराम यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदा इस्रायलींना आवर घातलाच पाहिजे; तडकाफडकी राजीनामा दिलेल्या ट्रम्पच्या शिलेदाराचा थेट इशारा
  • पाकिस्तानने जागतिक युद्ध थांबवलं, डोनाल्ड ट्रम्पनी शत्रूराष्ट्राचे आभार मानणे ही मोदींना मारलेली चपराक: संजय राऊत
 DIGITAL PUNE NEWS

बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट; लक्ष्मण हाके माघारी, सुनेत्रा पवारांना पाठिंबा

डिजिटल पुणे    06-04-2026 12:49:12

बारामती  : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या टप्प्यात महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. ओबीसी आंदोलनाशी संबंधित असलेले लक्ष्मण हाके यांनी उमेदवारी अर्ज न भरता निवडणुकीतून माघार घेतली असून त्यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे येथील लढत आता थेट सुनेत्रा पवार आणि काँग्रेसचे आकाश मोरे यांच्यात होणार आहे.

हाके हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बारामतीत दाखल झाले होते. मात्र, याच दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी सक्रिय हालचाली करत त्यांची मनधरणी केली. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आणि भावनिक तसेच विकासाच्या मुद्द्यांवर भर देत त्यांना माघार घेण्यास प्रवृत्त केले.

या घडामोडीत सुनेत्रा पवार यांचाही थेट सहभाग होता. त्यांनी स्वतः हाके यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत परिस्थिती स्पष्ट केली. त्यानंतर राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांचेही फोन आल्यानंतर हाके यांनी आपला निर्णय बदलल्याचे सांगितले.माघार घेतल्यानंतरही हाके यांनी आपल्या मुद्द्यांवर ठाम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, आपण मांडत असलेल्या प्रश्नांवर पुढेही आक्रमक भूमिका कायम ठेवणार आहोत.

दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काही पातळ्यांवर प्रयत्न झाले होते. मात्र काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी देत सामना कायम ठेवला आहे. त्यामुळे बारामतीत आता सरळ द्विपक्षीय लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.


 Give Feedback



 जाहिराती