सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • महाराष्ट्रासाठी अजितदादांचं मोठं योगदान, बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हायला पाहीजे होती : छत्रपती संभाजीराजे
  • मैदानावर रक्ताचा सडा! रन आऊटच्या वादातून अंपायरला चाकूने वार करून संपवलं; क्रिकेट विश्वाला हादरवून सोडणारी घटना
  • बारामती पोटनिवडणुकीत रंगत वाढली; “एक मत हीच खरी श्रद्धांजली” – रोहित पवारांचे भावनिक आवाहन
  • ट्रम्प यांनी जाहीर शिवीगाळ करत धमकी देताच इराणकडून जागतिक इंधन पुरवठा ठप्प करण्याची धमकी; पुढील 48 तासात काय होणार? युद्धखोर ट्रम्पमुळे पेट्रोल, डिझेल, अन् गॅससाठी जगाला धडकी भरायची वेळ
 जिल्हा

१५ वर्षीय मुलगी बेपत्ता, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    06-04-2026 17:49:52

उरण : उरण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा BNS कलम १३७(२) आणि IPC कलम ३६३ अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी श्रीमती कल्पना समीर विजयम बय ४२, धंदा मजुरी, राहतात दि.ब्रा. हॉलचे बाजुला, अमृत म्हात्रे यांचे घर कमांक ३१७ जासई ता. उरण जि. रायगड येथे आहेत. 
 
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी कु. स्मिता समीर विजयम (वय १५ वर्ष) घरातून बेपत्ता झाली आहे. ती ४ फूट १ इंच उंचीची, बांधे-मजबुत, रंग-गोरा, चेहरा- गोल, केस-काळे लांब, अंगात पांढरा मऊम शर्ट व पायात मस्त रंगाचा सलवार परिधान केलेला असून भाषा - मराठी, हिंदी व इंग्रजी अवगत आहे.
गुन्हा दाखल करण्याचे कारण म्हणजे २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजताचे सुमारास उरण येथील हॉलचे बाजुला, अमृत म्हात्रे यांचे घर कमांक ३१७ जासई ता. उरण येथून ती बेपत्ता झाली.
 
पोलीस तपास अधिकारी सपोनि राजेश खांडवे, उरण पोलीस ठाणे, नवी मुंबई (मोबाईल नंबर ९८३४८६४३४४) यांनी तपास सुरू केला आहे. फिर्यादीचे ई-साक्ष नोंदवण्यात आले आहे.
पोलीसांनी फिर्यादीची मुलगी कु. स्मिता समीर विजयम याच्या बेपत्ता होण्याच्या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून, तिच्या सुरक्षित परतण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. उरण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी  यांनी या प्रकरणावर लक्ष ठेवले आहे.


 Give Feedback



 जाहिराती