सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या कोटणीस कॉम्प्लेक्स इमारतीतील अंतर्गत सोयी-सुविधांच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडले. नूतनीकरण अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती घेऊन ही कामे विहित वेळेत व दर्जेदार झाली पाहिजेत, असे मंत्री गोरे यांनी यावेळी सूचित केले.यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, नगरसेविका रोहिणी तडवळकर यांच्यासह अन्य मान्यवर, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.या कामासाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत ₹2.35 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून कामाचा कालावधी 8 महिने एवढा निश्चित करण्यात आला आहे.