पुणे : 'दस्तकारी हाट' सिल्क महोत्सव आयोजित करण्यात आला असून देशभरातील विणकामगारांच्या वस्त्र कलेचे प्रदर्शन भरत आहे.दि.९ एप्रिल ते १९ एप्रिल २०२६ या कालावधीत वाशी रेल्वे स्थानकाजवळ सिडको एक्झिबिशन सेंटर येथे सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत हे प्रदर्शन भरणार आहे. फॅशनप्रेमी आणि वस्त्रप्रेमींसाठी लग्नसराईपूर्वी खरेदीची एक उत्तम संधी आहे.
उन्हाळा आणि लग्नसराईसाठी आयोजित या उपक्रमात अस्सल भारतीय विणकाम आणि कापडांच्या विस्तृत श्रेणीवर ६० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. आकर्षक सिल्कपासून ते आरामदायी कॉटनपर्यंत, भारतातील विविध राज्यांतून आणलेले कलेक्शन एका छताखाली उपलब्ध असणार आहे.८० पेक्षा अधिक स्टॉल्ससह येथे पारंपरिक कारागिरी, आधुनिक डिझाईन्स आणि लग्नाच्या हंगामासाठी खास तयार केलेले आकर्षक संग्रह पाहायला मिळणार आहेत.सर्वांसाठी प्रवेश आणि पार्किंग मोफत आहे.