सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
  • युद्धखोर इस्त्रायलचा पहिल्याच दिवशी युद्धविरामाला सुरुंग, लेबनाॅनमध्ये 10 मिनिटात 254 जणांच्या कत्तली; अमेरिकेनं सुद्धा पलटी मारली; संतप्त इराणनं होर्मुझ मार्ग पुन्हा रोखला, उद्यापासून चर्चा होणार तरी कशी?
  • मोठी बातमी: राजकारणातील अचंबित करणारी घटना, देवेंद्र फडणवीसांचा हर्षवर्धन सपकाळांना फोन
 क्राईम

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेमसंबंधातून धक्कादायक हत्या; पेट्रोल पंपावर तरुणीवर जीवघेणा हल्ला

डिजिटल पुणे    09-04-2026 18:17:39

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरात प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादामुळे एक गंभीर गुन्हा घडल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर–जालना महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या २७ वर्षीय तरुणीचा तिच्याच ओळखीच्या व्यक्तीने दिवसाढवळ्या जीव घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, संबंधित तरुणी नेहमीप्रमाणे आपल्या कामावर असताना आरोपी तेथे आला. दोघांमध्ये काही काळापासून वाद सुरू असल्याचे सांगितले जात असून, त्याच पार्श्वभूमीवर आरोपीने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी होऊन तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेचा संपूर्ण प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमध्ये नोंदला गेला आहे. घटनेनंतर परिसरात घबराट पसरली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.प्राथमिक चौकशीत दोघांमध्ये पूर्वीपासून ओळख व संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती