सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले
 क्राईम

पुणे गुन्हे शाखेची कारवाई: वर्षभर फरार असलेला आरोपी अखेर जेरबंद

डिजिटल पुणे    10-04-2026 16:12:24

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-२ ने मोठी कारवाई करत गंभीर गुन्ह्यातील गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक केली आहे. संबंधित आरोपीवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो गुन्हा घडल्यापासून पोलिसांना चकवा देत होता.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युनिट-२ च्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यात आला. ही माहिती शिवाजीनगर परिसरात आरोपी लपून बसल्याची होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजसिंग युवराजसिंग जुनी (वय २५, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) असे असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी त्याला स्वारगेट पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. आरोपीच्या अटकेमुळे संबंधित गुन्ह्याचा तपास अधिक वेगाने होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


 Give Feedback



 जाहिराती