सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • संतोष देशमुख केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला, माझ्या खच्चीकरणासाठी प्रयत्न केले गेले; धनंजय देशमुखांचा दावा
  • मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
  • पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
 जिल्हा

मुंबईत उद्यापासून ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ ची अंतिम फेरी

डिजिटल पुणे    11-04-2026 16:07:58

मुंबई : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘माय युवा भारत’द्वारे ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ मुंबई झोनच्या अंतिम फेरीची घोषणा करण्यात आली आहे. या झोनमध्ये महाराष्ट्र, गोवा आणि पुदुच्चेरीचा समावेश आहे. ही दोन दिवसीय अंतिम फेरी १२ व १३ एप्रिल २०२६ दरम्यान नवी मुंबईतील नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे होणार असल्याची माहिती माय युवा भारत महाराष्ट्र व गोवा चे राज्य संचालक अमित पुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माय युवा भारत मुंबई चे उपसंचालक अनुप इंगोले उपस्थित होते.

अमित पुंडे यांनी सांगितले की, या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात देशभरातून राष्ट्रीय स्पर्धेतून निवड झालेले उत्कृष्ट युवा सहभागी एकत्र येणार आहेत. दोन दिवसीय विचारमंथन सत्रात शिक्षणतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विषयविशेषज्ज्ञ सहभागी होऊन केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ शी निगडित विषयांवर चर्चा करतील. देशभरातील १७ ठिकाणांहून १५,००० हून अधिक युवक या संवादात सहभागी होणार आहेत.

देशभरातून १२ लाखांहून अधिक युवकांनी सहभाग नोंदवला असून ४६,५०० पेक्षा अधिक निबंध प्राप्त झाले आहेत. मुंबईतील अंतिम फेरीत सहभागी युवक विकसित कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकरी कल्याण बळकटीकरण तसेच मानवी संसाधन शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार या विषयांवर चर्चा पुढे नेतील. १२ एप्रिल रोजी सहभागींचे आगमन व नोंदणी होईल आणि दुपारी महिला युवा संसद आयोजित केली जाईल. १३ एप्रिल रोजी उद्‌घाटन समारंभ, माय भारत सत्र आणि दोन तज्ज्ञ पॅनल चर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

‘नारी शक्तीः विकसित भारत की आवाज’ या विषयावर आधारित महिला युवा संसद हा कार्यक्रमाचा विशेष भाग असेल. या सत्रात महिला सहभागी महिला आरक्षण विधेयकावर संसदीय पद्धतीने चर्चा करतील. पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी १२ एप्रिलच्या सायंकाळी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने ‘संडे ऑन सायकल’ हा उपक्रम नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम येथे आयोजित करण्यात येणार आहे.

१३ एप्रिल २०२६ रोजी निवडलेल्या  ९११ सहभागींचा केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध क्षेत्रांवर सखोल संवाद होईल. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांसह हा संवाद होणार आहे.२ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. माय भारत बजेट क्वेस्ट 2026 हा उपक्रम केंद्रीय अर्थसंकल्प 2026 आणि युवकांच्या आकांक्षा यांना जोडणारा एक परिवर्तनशील मंच ठरला आहे. विशेषतः विकसित भारत युवा लीडर्स डायलॉगमधून आलेल्या अनेक कल्पनांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला असून, यामुळे धोरणनिर्मितीत युवांना केंद्रस्थानी ठेवण्याच्या सरकारच्या बांधिलकीला अधोरेखित केले आहे, असेही श्री. पुंडे यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती