सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • संतोष देशमुख केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला, माझ्या खच्चीकरणासाठी प्रयत्न केले गेले; धनंजय देशमुखांचा दावा
  • मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
  • पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
 विश्लेषण

सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, देशभरातून अश्रुपूर्ण श्रद्धांजली

डिजिटल पुणे    13-04-2026 18:08:49

मुंबई : भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज असलेल्या Asha Bhosle यांना आज मुंबईत अत्यंत भावनिक वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने केवळ सिनेसृष्टीच नव्हे, तर संपूर्ण देश शोकमग्न झाला आहे.

आशा भोसले यांचे 12 एप्रिल रोजी वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. आज सकाळी लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. या वेळी चित्रपट, संगीत आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.

सिनेसृष्टीपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. अभिनेत्री तब्बू, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता रितेश देशमुख, गायक सुदेश भोसले, अभिनेते राकेश रोशन, अभिनेत्री नीना गुप्ता, मंगलप्रभात लोढा आणि भय्याजी जोशी, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, राज्यपाल जिष्णू देव शर्मा, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे तसंच विश्वास नांगरे-पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. मुंबई पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली, तर राज्यातील वरिष्ठ नेतेही अंत्यसंस्काराला उपस्थित होते. त्यांच्या निधनामुळे संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

भारतरत्न आणि 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखल जायचं. तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय. त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन, ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली.दरम्यान, अंत्यसंस्कारा गायक सुदेश भोसले, अनुप जलोटा आणि शान यांनी गाण्यांद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्या क्षणाचे उपस्थितांचे डोळे पाणावले आणि अधिकच वातावरण अधिकच हळवं झालं.

आपल्या कारकिर्दीत अनेक अडचणींवर मात करत आशा भोसले यांनी संगीताच्या प्रत्येक प्रकारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणी आणि गाणी कायमच रसिकांच्या मनात जिवंत राहतील.पूर्ण देशाला आपल्या सुरांनी मोहिनी घालणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना आज साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. संगीत, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीत हा अंत्यविधी सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या गायक कलाकारांनी आपल्या लाडक्या 'आशा ताईं'ना त्यांच्याच गाण्यांच्या सुरांनी श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यविधीच्या वेळी वातावरण अत्यंत शोकाकुल होते. अशा वेळी शब्दांपेक्षा सुरांनीच भावनांना वाट करून दिली. ज्येष्ठ गायक सुदेश भोसले यांनी आशा ताईंसोबत अनेक दशके काम केले आहे. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी आशा ताईंच्या आठवणीत "यहा कल क्या हो किसने जाना" हे अजरामर गाणे गायले. हे गाणे गाताना त्यांचा आवाजही गहिवरला होता, ज्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले. भजन सम्राट अनुप जलोटा यांनी देखील आपल्या खास शैलीत गाणे सादर करत आशा ताईंच्या सांगीतिक वारशाला वंदन केले. लोकप्रिय गायक शान यानेही आपल्या भावना सुरांच्या माध्यमातून मांडल्या


 Give Feedback



 जाहिराती