पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी 'संविधान ग्रुप' च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करून कृतिशील अभिवादन केले.नियती फाऊंडेशन संचालित बाल आश्रम, वृद्धाश्रम (आळंदी )येथे अन्न धान्य वाटप,शालेय साहित्य वाटप करण्यात आले.पुण्यात पुस्तके वाटप,गुणवंतांचा सत्कार,पाणी वाटप,भीम जलसा असे विविध कार्यक्रम सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत आयोजित करण्यात आले. 'संविधान ग्रुप' चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन गजरमल,संस्थापक राकेश सोनवणे,प्रदेश संघटक प्रवीण सोनवणे,पुणे शहराध्यक्ष गणेश लांडगे,पुणे शहर उपाध्यक्ष राजवर्धन कांबळे,नीलेश निकम,सागर जगताप,सतीश नेहाटकर,बाळासाहेब कडू,मुदस्सर शेख,सागर आढागळे,प्रफुल देवकुळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणारी बाबासाहेबांच्या विचारांची वीस हजार पुस्तके वाटप करण्यात आली. डॉ.आंबेडकर जयंतीसाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार,डीसीपी राजलक्ष्मी शिवणकर ,एसीपी शिंदे ,अल्फान्सो मॅडम ,बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , एलआयबी चे बांगर, डांगे व इतर पोलीस अधिकारी यांनी बंदोबस्त ठेवला,ट्रॅफिकच्या नियोजन केल्याबद्दल सर्व पोलिसांचे आभार मानण्यात आले.