सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • संजूच्या जिद्दीचा विजय; आयसीसी 'प्लेयर ऑफ द मंथ' किताबावर आता सॅमसनचंच नाव, रचला इतिहास
  • मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
 क्राईम

चंद्रपूरात भीम जयंतीला हिंसाचाराचे सावट; डीजेवरील किरकोळ वादातून तरुणाची हत्या

डिजिटल पुणे    15-04-2026 12:34:46

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवादरम्यान घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. गांधी चौक परिसरात मध्यरात्री डीजेवर नाचताना झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट हत्येत झाले. या घटनेत रविकांत टेंभूरकर (वय 36) यांचा मृत्यू झाला असून, त्यांना रुग्णालयात नेत असतानाच प्राण गमवावे लागले.

माहितीनुसार, डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद चिघळत गेल्यानंतर पाच युवकांनी टेंभूरकर यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक केली असून तपास सुरू आहे.ही मिरवणूक शहरातील इंदिरानगर भागातील एका मंडळाच्या वतीने काढण्यात आली होती. मात्र, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर युवकांकडे शस्त्रे असल्याची बाब समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती