सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
  • राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
  • पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
  • उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
  • महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील, 33 टक्के महिलांना इथं येऊ द्यात: नरेंद्र मोदी
 क्राईम

सोलापूरमध्ये धक्कादायक प्रकार; पतीकडून पत्नीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

डिजिटल पुणे    16-04-2026 14:38:05

सोलापूर : सोलापूर शहरात एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लोकमान्य नगर परिसरात एका विवाहित महिलेला तिच्याच पतीने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत महिला गंभीररीत्या भाजली असून तिच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार, नर्गिस शेख (वय ३६) आणि फैजान शेख यांचा विवाह सप्टेंबर २०२४ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांपर्यंत त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र त्यानंतर दोघांमध्ये मतभेद वाढत गेले आणि ते वेगवेगळे राहत होते. विशेषतः तलाकच्या मुद्द्यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे.

बुधवारी रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास आरोपी फैजान शेख हा पत्नीच्या घरी आला. पत्नीशी बोलायचे असल्याचे सांगून त्याने तिला घरातील एका खोलीत नेले. या दरम्यान दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. संतापाच्या भरात त्याने सोबत आणलेल्या पेट्रोलची बाटली काढून पत्नीच्या अंगावर ओतली आणि लाईटरच्या सहाय्याने तिला पेटवून दिले.

आग लागल्यानंतर महिला जीव वाचवण्यासाठी बाहेर धावत आली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी तातडीने मदत केली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


 Give Feedback



 जाहिराती