सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ;प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
  • बिग बॉसच्या घरात ‘लाइव्ह कॉन्सर्ट’! अभिजितच्या एन्ट्रीने सगळेच झाले फॅन; हे 'एव्हरग्रीन' गाणं म्हणत दिला सुखद धक्का
  • 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
 शहर

पुण्याच्या महापौर मंजुषा ताई नागपुरे यांनी पालकांशी संवाद साधला

डिजिटल पुणे    17-04-2026 11:39:15

पुणे : "आई-वडील हे मुलांचे पहिले गुरू, तर शिक्षक हे त्यांचे दुसरे गुरू असतात. शाळेच्या पहिल्या दिवशी पालक आपल्या लहानग्यांना विश्वासाने शिक्षकांच्या स्वाधीन करतात. त्यांच्या शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार देण्याची जबाबदारी शिक्षक पार पाडतात.

आजच्या काळात केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून, मुलांना बाह्य जगाची ओळखही लहान वयात करून देणे आवश्यक आहे. वाढता स्क्रीन टाइम ही चिंतेची बाब असून, जबाबदार पालक म्हणून मुलांना शक्य तितक्या वेळा मोकळ्या मैदानावर खेळायला नेणे गरजेचे आहे, " असे मार्गदर्शन पुण्याच्या महापौर मंजुषा ताई नागपुरे यांनी केले.

निमित्त होते डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेतील पूर्व-प्राथमिक विभागातील मोठ्या गटाच्या पदवीदान समारंभाचे. या प्रसंगी इयत्ता पहिलीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणेरी पगडी घालून आणि विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यानंतर मानसशास्त्रज्ञ पेंडसे मॅडम यांनी पालकांशी संवाद साधला. शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडला . या कार्यक्रमाला डेक्कन एज्युकेशन सोसायटी चे पदाधिकारी ऍडव्होकेट श्री अशोक पलांडे सर, ऍडव्होकेट राजश्री ताई ठकार , डी ई एस च्या मुख्याध्यापिका विजया जोशी उपस्थित होत्या.

 

 

 


 Give Feedback



 जाहिराती