सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
  • राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
  • पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
  • उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
  • महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील, 33 टक्के महिलांना इथं येऊ द्यात: नरेंद्र मोदी
 जिल्हा

२० हजार लिटर अवैध पेट्रोलियमसह टँकर जप्त, ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ठाण्यात भरारी पथक आणि पोलिसांची कारवाई

डिजिटल पुणे    17-04-2026 12:10:41

मुंबई : रेशनिंग विभागास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाण्यातील कोपरी पोलीस ठाणे हद्दीत पहाटेच्या सुमारास शिधावाटप भरारी पथक आणि पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत २० हजार लिटर डिझेलसदृश अवैध पेट्रोलियम पदार्थासह टँकर जप्त करण्यात आला असून सुमारे ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप विभागाच्या मार्फत देण्यात आली आहे.

१६ एप्रिल २०२६ रोजी पहाटे १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास एमएच-46-सीयू-7536 क्रमांकाचा टँकर कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय मोठ्या प्रमाणात डिझेलसदृश पेट्रोलियम पदार्थाची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनियंत्रक शिधावाटप, फ परिमंडळ ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोपरी पोलीस स्टेशनच्या सहकार्याने तपासणी मोहीम राबविण्यात आली.

तपासणीदरम्यान संबंधित टँकर अडविण्यात आला असता त्यामध्ये सुमारे २० हजार लिटर इतका पेट्रोलियम साठा आढळून आला. या साठ्याबाबत वैध कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने हा माल बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ कारवाई करत टँकरसह संपूर्ण साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून उपनियंत्रक शिधावाटप कार्यालय, फ परिमंडळ ठाणे व कोपरी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती