छत्रपती संभाजीनगर : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अपघातात मृत्यू झाला आहे. संभाजी नगरहून शिर्डीला जात असताना त्यांच्या कारता भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातातबाबात मिळालेल्या माहितीनुसार उभ्या कंटेनरला कारची पाठीमागून धडक दिली असल्याची माहिती आहे. कार थेट कंटेनरखाली घुसली आहे. या अपघातात जितेंद्र शेळकेंचा आणि पत्नीचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल आहे.
समृद्धी महामार्गावर शनिवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात संभाजीनगरहून शिर्डीकडे जाणाऱ्या कारचा कंटेनरला जोरदार धक्का बसला आणि या अपघातात एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा लहान मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कारने मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार थेट कंटेनरखाली अडकली. अपघाताचा जोर इतका मोठा होता की वाहनातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढून उपचारासाठी पाठवले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात सुमारे दुपारी १२:३० च्या सुमारास झाला. घटनास्थळी ग्रामस्थ आणि स्थानिक अधिकारी तातडीने पोहोचले. बचावकार्यादरम्यान क्रेन उशिरा पोहोचल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे कारमध्ये अडकलेल्या व्यक्तींना वेळेत बाहेर काढता आले नसल्याचे सांगितले जात आहे.
जखमी मुलाने स्वतःची ओळख पटवून दिल्याची माहितीही मिळाली आहे. त्याला हाताला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, या अपघातानंतर काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असून वाहनाचा वेग, रस्त्याची स्थिती आणि तांत्रिक कारणे याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.या घटनेनंतर काही राजकीय प्रतिक्रिया उम