सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
 शहर

महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त भव्य मोटारसायकल रॅली व महाआरती उत्साहात संपन्न

गजानन मेनकुदळे    20-04-2026 11:27:40

पुणे  (सिंहगड रोड ) – आज वीरशैव धारेश्वर सेवा संघ व वीरशैव लिंगायत समाज, शिवणे (नांदेड सिटी) यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य मोटारसायकल रॅली व महाआरती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमातून समाजातील एकतेचा व बंधुभावाचा संदेश देण्यात आला.

या रॅलीमध्ये विशेष आकर्षण ठरले ते श्रीरंग गणेश वसेकर यांचे. त्यांनी स्केटिंग शूज घालून संपूर्ण रॅली पूर्ण करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या अनोख्या कौशल्याचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रमास सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष सचिन मोरे, नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेवक श्रीकांत जगताप, नगरसेविका ज्योतीताई गोसावी, शरद दबडे सामाजिक कार्यकर्ते तसेच वीरशैव धारेश्वर सेवा संघ सिंहगड रोड, वीरशैव लिंगायत समाज शिवणे व लिंगायत समाज नांदेड सिटीचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

 

यावेळी नावंदे सर, रमेश मिटकरी, सुनील वनपत्रे, रवी कल्याणी, महेश कुगावकर, बसवराज आमाने, बाळासाहेब कंगले, वसेकर, कापसे सिद्राम, चक्रे बाळासाहेब, घोडके पाटील, किरण मुळे, शिवलिंग तागडे, सोमनाथ गाढवे, राजू करजखेडे, तात्या नकाते आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. रॅली व महाआरतीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


 Give Feedback



 जाहिराती