सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
  • मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
 क्राईम

ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने तरुणाची आत्महत्या; कोल्हापुरातील घटना, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

डिजिटल पुणे    20-04-2026 16:31:38

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कोरोची गावात ऑनलाईन गेमिंगमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गमावल्यामुळे एका 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदित्य मिलिंद कोळी असे मृत तरुणाचे नाव असून, शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोची बसस्थानकाजवळील राहत्या घरी आदित्यने घरातील कोणी नसताना वरच्या मजल्यावरील खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. सायंकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आदित्यने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन आर्थिक नुकसान झाल्यामुळे नैराश्य निर्माण झाल्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षीच वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. अशा परिस्थितीत आर्थिक तणाव वाढल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी आदित्यच्या नातेवाईकांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या व्यसनाबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती