सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
  • मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
 विश्लेषण

बारामती पोटनिवडणूक: “काल सुनेत्रा वहिनींचा फोन आला…”; सांगता सभेला जाण्याबाबत सुप्रिया सुळे यांची भूमिका स्पष्ट

डिजिटल पुणे    21-04-2026 14:45:45

पुणे: बारामती पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून आज होणाऱ्या सांगता सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या उपस्थितीबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

सुळे म्हणाल्या की, त्यांना काल सुनेत्रा पवार यांचा फोन आला होता. “कुटुंब म्हणून प्रचारासाठी यावे,” असे आमंत्रण देण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना सुळे यांनी सांगितले की, कुटुंबीय नात्यांमुळे त्या सभेला उपस्थित राहणार आहेत, मात्र त्याचवेळी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांशीही त्यांनी चर्चा केली आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. काँग्रेस आणिउद्धव ठाकरे यांच्या पक्षानेही सहकार्याची भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान,शरद पवार यांच्या उपस्थितीबाबत विचारले असता, ते सध्या ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणीसाठी असल्याचे सुळे यांनी सांगितले. त्यामुळे ते सभेला येणार की नाही, हे नंतर स्पष्ट होईल.

वैयक्तिक भावनांबाबत बोलताना सुळे यांनी आपले दुःख व्यक्त केले. “भाऊ गेल्याची जाणीव अजूनही मनाला पटत नाही. आजही अनेक प्रश्न मनात येतात,” असे त्या म्हणाल्या. तरीही जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्या बारामतीला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आज दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास त्या सभेत सहभागी होणार असून, कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दिवंगत Ajit Pawar यांचे निकटवर्तीय असलेल्या सुमारे २०० जणांना या सांगता सभेसाठी विशेष आमंत्रण देण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती