सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
  • मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
 क्राईम

हैदराबादमध्ये थरारक कट उघड; जेवणात विष मिसळून सासरच्या कुटुंबाचा खात्मा करण्याचा प्रयत्न, नखांवरील ‘मीस लाईन्स’मुळे भांडाफोड

डिजिटल पुणे    21-04-2026 17:40:44

हैदराबाद : हैदराबादमध्ये एका धक्कादायक कटाचा पर्दाफाश झाला असून, परदेशात कार्यरत असलेल्या फार्मासिस्टने आपल्या विभक्त पत्नीच्या कुटुंबाला संपवण्यासाठी अन्नात विष मिसळल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, एका डॉक्टरच्या सतर्कतेमुळे हा मोठा गुन्हा उघडकीस आला.

जुलै २०२३ मध्ये ३० वर्षीय महिलेची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या शरीरात सूज, उलट्या आणि जुलाब अशी लक्षणे दिसत होती. तपासणीदरम्यान डॉक्टरांच्या लक्षात आले की तिच्या नखांवर पांढऱ्या आडव्या रेषा आहेत. वैद्यकीय दृष्ट्या ‘मीस लाईन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खुणा आर्सेनिक विषबाधेचे संकेत देतात. त्यानंतर केलेल्या चाचण्यांमध्ये तिच्या शरीरात विषाचे प्रमाण अत्यंत जास्त असल्याचे स्पष्ट झाले.

तपासात उघड झाले की, पीडित महिलेच्या बहिणीचा विभक्त पती हा या कटामागील मुख्य सूत्रधार आहे. वैवाहिक वादातून निर्माण झालेल्या रागातून त्याने पत्नीच्या संपूर्ण कुटुंबाचा खात्मा करण्याचे नियोजन केले होते. यासाठी त्याने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने आर्सेनिक मिळवून ते मीठ आणि मसाल्यात मिसळून डिलिव्हरीद्वारे घरापर्यंत पोहोचवले.

घटनेदरम्यान कुटुंबातील सर्व सदस्यांना अन्न सेवनानंतर त्रास जाणवू लागला. सुरुवातीला हा साधा आजार असल्याचे वाटले, मात्र काही दिवसांतच पीडितेच्या आईचा मृत्यू झाला. नंतरच्या तपासात हा मृत्यू नैसर्गिक नसून विषबाधेमुळे झाल्याचे स्पष्ट झाले.

यापूर्वीही आरोपीने सासऱ्याला अपघात घडवून मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. अखेर पोलिसांनी या प्रकरणात आरोपीच्या नातेवाईकांसह अनेकांना अटक केली असून मुख्य आरोपीला परदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे.या घटनेमुळे कौटुंबिक वाद किती टोकाला जाऊ शकतो, याचे भयावह चित्र समोर आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती