सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
  • मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
 DIGITAL PUNE NEWS

केदारनाथ धामचे दरवाजे भक्तांसाठी खुले; “हर हर महादेव”च्या जयघोषात भक्तिमय वातावरण

डिजिटल पुणे    22-04-2026 12:09:14

उत्तराखंड : उत्तराखंडमधील पवित्र केदारनाथ धामचे दरवाजे आज, बुधवार 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता विधीवत उघडण्यात आले. दरवाजे खुलताच “हर हर महादेव”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला आणि वातावरण पूर्णपणे भक्तिमय झालं.

चारधाम यात्रेतील प्रमुख स्थान असलेल्या या धामात दर्शनासाठी हजारो भाविक पहाटेपासूनच जमा झाले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही उपस्थित राहून दर्शन घेतले.रुद्रप्रयाग जिल्ह्यातील मंदाकिनी नदीच्या काठावर वसलेले केदारनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, येथे दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो आणि आध्यात्मिक शांती तसेच मोक्षप्राप्ती मिळते, अशी श्रद्धा आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक केदारनाथ यात्रेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. ही यात्रा साधारणपणे पुढील सहा महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहे. यात्रेसाठी इच्छुक भाविकांनी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक असून, 55 वर्षांवरील व्यक्तींना वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, बद्रीनाथ धामचे कपाट उद्या, 23 एप्रिल रोजी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 6:15 वाजता भक्तांसाठी खुले होणार आहेत. याआधी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे 19 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर उघडण्यात आले होते.


 Give Feedback



 जाहिराती